आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case Before Verdict What Salman Khan Is Going Through

Hit and Run Verdict: सलमानच्या आई सलमा खान यांची काळजी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई सलमा खानसोबत सलमान खान)
मुंबईः बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाच्या निकालाची वेळ जवळ आली आहे. येत्या 6 मे रोजी न्यायालयात यावर अखेरची सुनावणी होणारेय. या प्रकरणी सलमान दोषी आढळल्यास त्याला दहा वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. त्यामुळे सलमानच्या जवळचे मित्र आणि नातेवाईकांची काळजी वाढली आहे.
सलमान खरं तर बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. मात्र आता त्याला न्यायालय काय निकाल देणार, यापेक्षा आपल्या कुटुंबीयांची जास्त काळजी सतावतेय. अलीकडेच Divyamarathi.com ने सलमान खानचे जवळचे मित्र आणि काही लोकांशी बातचित करुन सध्या तो कुठल्या परिस्थितीला तोंड देतोय, हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला.
सलमानच्या जवळच्या मित्राने सांगितल्यानुसार, "याकाळात सलमान खूपच शांत आहे. आपल्या कामावर त्याने संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. आपल्या कुटुंबीयांसाठी तो काळजीत पडला आहे. विशेषतः आई सलमा खान यांच्यासाठी त्याची चिंता वाढली आहे."
दुसरीकडे सिनेनिर्मातेसुद्धा सलमानची निर्दोष मुक्तता व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानला तुरुंगवास झाल्यास, अनेक निर्मात्यांना त्याचा आर्थिक फटका बसणार आहे. सलमानवर इंडस्ट्रीचे जवळजवळ चारशे ते पाचशे कोटी रुपये लगाले आहेत.
सलमानच्या एका जवळच्या मित्राने नाव न प्रकाशित करण्याचा अटीवर सांगितले, "घरातील प्रत्येकाचा सलमानला पाठिंबा मिळाला आहे. त्याची आई सलमा खान यांची काळजी वाढली आहे. 6 मे रोजी काय घडणार याच्याच विचारात त्या आहेत. सलमानच्या 'बजरंगी भाईजान'च्या सिनेमाच्या सेटवर त्याची धाकटी बहीण अर्पिता खान हजर आहे. सलमा खान यांच्या म्हणण्यावरुनच अर्पिता सलमान खानसोबत हजर आहे."
पुढे वाचा, डेजी शाह आणि करण जोहर यांनी यासंदर्भात काय म्हटले...