(फाइल फोटो- रविंद्र पाटील)
मुंबई- बहुचर्चित 'हिट अँड रन' प्रकरणात कोर्टाने आज निर्णय सुनावला आहे. या प्रकरणात त्याच्यावरील सर्व आरोप सिध्द झाल्याने त्याला पाच वर्षांचा कारावास सुनावण्यात आला आहे. तसेच 25 हजार रुपये दंडदेखील लावण्यात आला आहे. आज हे प्रकरण जगभरात चर्चेत आहे. परंतु या प्रकरणात साक्ष देणा-या लोकांविषयी अनेकांना माहित नाहीये. सलमानच्या या प्रकरणात पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी साक्ष दिली होती. यांच्या एका साक्षीने सलमान अडकला होता. रविंद्र पाटील सध्या
आपल्यात नाहीये.
'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य साक्षीदार रविंद्र पाटील
रविंद्र पाटील सलमानच्या 'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. रविंद्र यांना या प्रकरणातील सर्व धागेदोरे माहित होते. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेले रविंद्र आज या जगात नाहीये. रविंद्र यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागे काय कारण होते? याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया काही गोष्टींवरून.
अखेरच्या श्वासापर्यंत बदलला नाही जबाब-
रविंद्र पाटील यांना ओळखणा-या लोकांना ठाऊक होते, की रविंद्र यांच्यावर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असावा. रिपोर्ट्सनुसार, अनेक लोकांनी त्याच्यावर जबाब बदलण्यासाठी दबावसुध्दा टाकला होता, जेणेकरून
सलमान खान तुरुंगात जाणार नाही. परंतु रविंद्र यांना शेवटच्या क्षणापर्यंत आपला जबाब बदलला नाही. तसेच रविंद्र यांना जबाब बदलण्यासाठी धमकीसुध्दा देण्यात आली होती. एवढेच नव्हे पोलिसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना त्रासही दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रविंद्र पाटील यांच्याविषयी आणखी काही गोष्टी...