आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान प्रकरणी रविंद्र पाटलांचा गेला हकनाक बळी तरी शेवटपर्यंत बदलला नाही जबाब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः रविंद्र पाटील - Divya Marathi
फाइल फोटोः रविंद्र पाटील
मुंबई- 14 वर्षापूर्वी घडलेल्या मुंबईत घडलेल्या अभिनेता सलमान खानच्या हिट अॅंड रन प्रकरणाचा अंतिम आला असून, सलमान खानला सर्व आरोपातून निर्दोषमुक्त करण्यात आले आहे. अभिनेता सलमान खान याला या प्रकरणात मोठा दिलासा मिळणार हे निकाल वाचनावेळीच जवळपास निश्चित झाले होते.
'हिट अँड रन' प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते रविंद्र पाटील
28 सप्टेंबर 2002च्या मध्यरात्री अपघात झाल्यानंतर या प्रकरणातील मृत मुख्य साक्षीदार व सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील यांनी सलमानविरोधात तक्रार नोंदवली होती. मात्र, तो मद्याच्या अमलाखाली गाडी चालवत होता का? याचा उल्लेख कुठेही केला नाही. सलमानच्या रक्ताच्या नमुन्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पाटील यांनी सलमानने दारू प्राशन करून गाडी चालवल्याची साक्ष न्यायालयात दिली होती. या खटल्यात पाटील यांची साक्ष कायद्याच्या तरतुदीनुसार ग्राह्य धरता येणार नाही. रवींद्र पाटील यांचा 2007 मध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे याआधी त्यांनी दिलेले जबाब न्यायालयात सादर करण्यात आले. त्या वेळी सत्र न्यायालयाने पाटील यांची साक्ष ग्राह्य धरत सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. मात्र, पाटील सध्या साक्ष देण्यासाठी हयात नसल्याचे सलमानच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.
या प्रकरणातील मुख्य साक्षीदार असलेले रविंद्र आज या जगात नाहीये. रविंद्र यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यामागे काय कारण होते? याची संपूर्ण कहाणी जाणून घेऊया काही गोष्टींवरून.
अखेरच्या श्वासापर्यंत बदलला नाही जबाब-
रविंद्र पाटील यांना ओळखणा-या लोकांना ठाऊक होते, की रविंद्र यांच्यावर जबाब बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत असावा. रिपोर्ट्सनुसार, अनेक लोकांनी त्याच्यावर जबाब बदलण्यासाठी दबावसुध्दा टाकला होता, जेणेकरून सलमान खान तुरुंगात जाणार नाही. परंतु रविंद्र यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला जबाब बदलला नाही. तसेच रविंद्र यांना जबाब बदलण्यासाठी धमकीसुध्दा देण्यात आली होती. एवढेच नव्हे पोलिसांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना त्रासही दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या रविंद्र पाटील यांच्याविषयी आणखी काही गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...