आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुचे व्यसन आणि डिप्रेशनमुळे अशी झाली हनी सिंगची अवस्था, एवढा बदलला Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने नुकताच त्याचा एक नवा फोटो फेसबूकवर अपलोड केला आहे. या फोटोमध्ये हनी सिंगचा लूक चांगलाच बदललेला पाहायलामिळत आहे. हनी सिंग काही महिन्यांपासून bipolar disorder आणि डिप्रेशनने ग्रस्त होता. पण आता तो यातून बाहेर निघलाय. पण या सर्वाचा परिणाम त्यावर झालेला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारण लूकसाठी प्रसिद्ध असलेला हनी सिंग सध्या वेगळाच दिसतोय.

रिहॅब सेंटरला गेला होता...
काही दिवसांपूर्वी हनी सिंग रिहॅब सेंटरला गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानेच या सर्व बातम्या फेटाळल्या होत्या. मी बायपोलर डिसऑर्डरने त्रस्त आहे. 18 महीन्यात मी चार डॉक्टर बदलले. पण औषधांचाही परिणाम झाला नाही. माझ्याबरोबर काहीतरी विचित्र घडत होते, असे त्याने सांगितले होते. बायपोलर डिसऑर्डरबरोबरच हनी सिंगला दारुचे व्यसन जडले होते. त्याचाही त्याचा उपचार करावा लागला.

Bipolar Disorder म्हणजे काय
- या आजाराने व्यक्ती डिप्रेशन किंवा मेंटल डिसऑर्डरने ग्रस्त असतो. यामुळे संबंधित व्यक्ती अनेक आठवडे मानसिक दृष्ट्या त्रासलेला असतो.
- बायपोलर डिसऑर्डरमध्ये क्षणाक्षणाला व्यक्तीचा मूड बदलत असतो. कधी तो खूप खूश असतो तर कधी त्रासलेला असतो. अनेकदा डिप्रेशनमध्येही जाण्याची भिती असते.

कसा आला बाहेर...
- मानसिक आजारांप्रमाणेच बायपोलर डिसऑर्डरही वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्यामुळे डॉक्टरांना उपचार करण्याच अडचणी येत होत्या.
- बरेच दिवस डॉक्टरला नेमके काय झाले आहे हे निदानच होत नव्हते. त्यामुळेच हनी सिंगला चार डॉक्टर बदलावे लागले.
- त्याला अनेक दिवस औषधे सूट झाली नाही. त्यामुळे हळू हळू तो नैराश्यात जाऊ लागला होता.
- नंतर डॉक्टरांच्या एका टीमने योग्य निदान केले आणि उपचार सुरू केले. हळू हळू हनी सिंग यातून बाहेर येण्यात यशस्वी ठरला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, हनी सिंगचे काही निवडक PHOTO आणि जाणून घ्या Facts
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...