आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबा राम रहीम ठरले सोसायटी सदस्यांसाठी डोकेदुखी, घर रिकामे करण्यास सांगितले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू  आणि डेरा सच्चा सौदाचे सर्वेसर्वा गुरमीत राम रहीम सिंग यांना ते वास्तव्याला असलेल्या सोसायटीने घर खाली करुन दुसरीकडे शिफ्ट होण्याची अपील केली आहे. मुंबईतील जुहूमध्ये रिव्हेरा आणि रिव्हेरा बीच या दोन इमारतींची एक सोसायटी आहे. तिथल्या एका ड्युप्लेक्स फ्लॅटमध्ये बाबा राम रहीम यांनी खरेदी केला असून मागील 15 दिवसांपासून ते तेथे मुक्कामी आहेत. मात्र त्यांच्यामुळे सोसायटीतील लोक त्रासले असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. 

'बाबा'ची सुरक्षा ठरला डोकेदुखी... 
राम रहीम सिंह यांच्या  झेड-प्लस सुरक्षेला सोसायटीली लोक कंटाळले आहे. त्यामुळे ते सोसायटी सदस्यांना नकोसे झालेत. ते ज्या दिवशी सोसायटीत आले, तेव्हा त्यांच्या सुरक्षारक्षकांची फौज पाहून सदस्यांचे डोळेच फिरले. कुणीतरी आध्यात्मिक गुरू आपल्या घरात येतोय, असं सांगून घरमालकाने सोसायटीची परवानगी घेतली होती. पण, हे बाबा आपली अख्खी सोसायटीच व्यापून टाकतील, याचा कुणालाच अंदाज नव्हता. आल्या दिवसापासून बाबांचे  36 शस्त्रधारी रक्षक तळमजल्यावर 24 तास पहारा देत असतात. हीच झेड प्लस सुरक्षा सोसायटी सदस्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 
 
इमारतीत शिरताना प्रत्येकाची तपासणी केली जाते. या प्रकाराला रहिवासी वैतागलेत. आपल्याच घरी जायचीही चोरी झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इमारतीखाली खेळायलाच जागा शिल्लक नसल्याने मूलंही चिडली आहेत. कम्पाउंडमध्ये सतत गाड्यांची ये-जा सुरू असल्याने शांतताच हरवली आहे. याची दखल घेऊन लवकरच सोसायटीची मीटिंग घेऊन, बाबांना 'राम-राम' करण्याबाबत विचारविनिमय केला जाणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष सुरेश जासानी यांनी सांगितले.

पुढे वाचा, याच बिल्डिंगमध्ये वास्तव्याला आहे अक्षय कुमार.. 
बातम्या आणखी आहेत...