आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'किती दिवस बायकोच्या पदराआड लपणार\', कंगनाच्या बहिणीचा हृतिकवर हल्ला, केले अनेक प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंगना रनोट आणि हृतिकच्या वादात रोज नवे काहीतरी समोर येत आहे. हा वाद कंगनाने जेव्हा एका इंटरव्ह्यूमध्ये हृतिकला 'सिली एक्स' म्हटले होते, तेव्हा सुरू झाला होता. काही दिवसांपूर्वीच हृतिकच्या वकिलांनी कंगनाच्या विरोधात 29 पानी तक्रार दाखल केली होती. त्यात त्याने ते ईमेल्सही रिव्हील केले होते जे कंगनाने हृतिकला पाठवले होते. एका ट्वीटमध्ये तर रंगोलीने हृतिकला किती दिवस बायकोच्या पदराआड लपणार आहेस असे थेट विचारले आहे. 

कंगनाच्या बहिणीनेही रिव्हील केला हृतिकचा मेल... 
हृतिकने मेल रिव्हील केल्यानंतर रंगोलीनेही पलटवार करत हृतिकने कंगनाला केलेला ईमेल सोशल मीडियावर रिव्हील केला आहे. त्या मेलवरून स्पष्ट होते की, दोघांकडूनही ते नाते सारखेच होते. पण हृतिकने या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 

काय म्हटले ई मेल मध्ये 
हृतिकने या ईमेलमध्ये लिहिले आहे, तुझ्या मेलचा तर पूर आलाय. पण यात तुझी काहीही चूक नाही. आपले जीवन इतर कपल्सपेक्षा फार वेगळे आहे. असे व्हायला नको होते, पण हेच सत्य आहे. पण चांगली बाब म्हणजे मी यातून सावरण्याचा प्रयत्न करतोय. 
 
या मेलशिवाय कंगनाच्या बहिणीने एका व्हायरल फोटोवरूनही हृतिकला चांगलेच सुनावले आहे. या फोटोवर स्पष्टीकरण देताना हृतिकने म्हटले होते, की हा फोटो फोटोशॉप्ड असून एडिट केलेला आहे. पण रंगोलीने हे फोटो पोस्ट करत म्हटले, कंगनाला पकडलेला तूच नाहीस का, तू असे कसे म्हणू शकतो. रंगोलीने एका पाठोपाठ एक अनेक ट्वीट करत हृतिकला प्रश्न विचारले आणि त्याच्यावर हल्ला केला. 

कंगनाची बहिण रंगोलीने एकापाठोपाठ एक अनेक ट्वीट करत हृतिकवर हल्लाबोल केला आणि अनेक प्रश्न उपस्थित केले तिचे ट्विट्स आणि त्यात काय म्हटले आहे पाहुयात पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...