आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Parties Hard On His 42th Birthday, Hotel Fined Rs. 25,000 For Blasting Loud Music

मध्यरात्रीपर्यंत चालू होती हृतिकची बर्थडे पार्टी, हॉटेलवर ठोठावला 25 हजारांचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्टीत अमिषा पटेलसोबत हृतिक, AER लाऊंजचा फोटो - Divya Marathi
पार्टीत अमिषा पटेलसोबत हृतिक, AER लाऊंजचा फोटो
शनिवारी (9 जानेवारी) 3:30 वाजेपर्यंत मोठ्या आवाजात गाणी आणि गोंधळ चालू असल्याने मुंबईच्या वरळी परिसरात स्थित 'फोर सीजन्स' हॉटेलवर 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हृतिक रोशनच्या 42व्या बर्थडेनिमित्त येथे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीत शाहरुख खान, रणवीर सिंहसह बी-टाऊनचे अनेक स्टार्स पोहोचले होते.
काय आहे प्रकरण...
पार्टीमध्ये चालू असलेल्या गोंधळ आणि मोठ-मोठ्या आवाजातील म्यूझिकमुळे लोकांनी आधी रात्री 1:30 आणि पुन्हा मध्यरात्री 3:30 वाजता तक्रार दाखल केली. परंतु बॉलिवूड स्टार्सने भरलेल्या या पार्टीवर पोलिसांनीसुध्दा काहीच बंधन घातले नाही.
कुणी केली तक्रार...
दक्षिण मुंबईमध्ये राहणा-या अशरफ खानने जेव्हा लाऊड म्यूझिकची तक्रार दाखल केली, तेव्हा माहित झाले, की हॉटेलकडे मध्यरात्रीपर्यंत गाणी वाजवण्याचा परवाना नव्हता. पार्टीमुळे हॉटेलच्या मॅनेजरवर एकाच रात्री दोनवेळी 12,500 (एकूण 25 हजार) रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर रात्री 3:30 वाजता लाऊड स्पीकर बंद करण्यात आले आहे.
काय म्हणाला अशरफ खान...
मध्यरात्री 1:30 वाजता हॉटेलच्या जवळून जाणा-या अशरफ खानने गेटवर तैणात असलेल्या पोलिसांना पाहिले. परंतु त्यामधील कुणीच गाणी लाऊड स्पीकर बंद केले नाहीत. अशरफ म्हणाला, 'मी एका पोलिस कर्मचा-याला विचारले, या पार्टीसाठी मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात गाणे वाजवण्याचा परवानगी घेण्यात आली आहे? त्यांनी याचा नकार दिला. त्यांनी सांगितले, की ते एका मोठ्या स्टार्सच्या सुरक्षेत तैणात आहेत आणि पार्टी अटेंड करत आहेत.'
ट्रॅफिक ब्लॉक केले...
फोर सीजन्स हॉटेलच्या 34 मजल्यावर रुफटॉपवर असलेल्या एईआर लाऊंजमध्ये सुरु असलेल्या या पार्टीत आलेल्या सेलेब्सच्या कार हॉटेल बाहेर उभ्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरील ट्रॅफिकसुध्दा जाम झाले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिकच्या बर्थडे पार्टीचे निवडक इनसाइड फोटो...