आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hrithik Roshan Said Kangana Is Not My Target; But The Impostor

कंगना-ऋतिक वाद शिगेला, कंगनाला भीती ते खासगी फोटो व्हायरल होण्याची!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. - Divya Marathi
कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे.
मुंबई- कंगना राणावत आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. ऋतिक आणि त्याच्या टीमने काही खासगी फोटो दाखवून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोप कंगनाने केला आहे. ब्लॅकमेलिंग करणे किंवा धमकी देणे यामुळे मला फरक पडत नाही. कारण अशा घटनांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्यासाठी लव लेटर, फोटोज बाहेर आणले जात असतील आणि मी माफी मागावी म्हणून हे उद्योग सुरु असले तरी मी माफी मागणार नाही. मला माझ्या भूतकाळाबाबत काहीही लाज वाटत नाही असे कंगनाने ऋतिकला ठणकावून सांगितले आहे.
कंगनाने ठणकावले-
कंगनाने ऋतिकला ठणकावताना म्हटले की, मला कशाचीच तमा नाही. ना माझ्या भूतकाळाबाबत ना अफेयरबाबत, ना माझ्या शरीराबात ना माझ्या इच्छेबाबत...
- त्यामुळे मला बदनाम करण्याचा किंवा मला कॅरेक्टरलेस दाखवण्याचा कोणाला कसलाही फायदा होणार नाही. मी त्याला वाटत असेल की मी माफी मागावी तर त्याने आधी मुद्यांवर बोलावे.
- माझ्या नावाने ढोल बडवून काहीही हाती लागणार नाही. मी व माझी टीम मदत करायला तयार आहे. कारण कोणाला नुकसान पोहचावे असा माझा हेतू नाही.

ऋतिक म्हणाला, माझ्या निशाण्यावर कंगना नव्हे, दुसरी व्यक्ती...
ऋतिक याने शुक्रवारी सांगितले की, माझ्या निशाण्यावर कंगना राणावत नाहीये.
- ऋतिकच्या म्हणण्यानुसार, त्याला अशा त्या व्यक्तीपर्यंत पोहचायचे आहे ज्यांनी त्याच्या व कंगनाच्या नावाचा वापर करीत त्याला धोका दिला आहे.
- ऋतिक यामुळे त्रस्त आहे की, ऋतिकने ईमेल हॅक झाल्याबाबत जो गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे कंगनाचा गैरसमज झाला आहे.
दोघांत होऊ शकतो समझोता-
- माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिकने केलेले हे वक्तव्य महत्त्वपूर्ण आहे. याचा अर्थ असा काढला जाऊ शकतो की, या दोघांत आगामी काही दिवसात समझोता होऊ शकतो.
- कंगनाला काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने एक नोटिस पाठवून आपला जबाब नोंदवण्यास सांगितले आहे.
- या नोटिशीची कॉपी दोन्ही पक्षाला पाठवली गेली. कंगनाला ही नोटिस शुक्रवारी मिळाली आहे.
ऋतिकचे जवळचे काय म्हणतात?
- ऋतिक रोशनच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे की, ऋतिकचे ई-मेल खाते कोणत्या तरी अज्ञात व्यक्तीने हॅक केले आहेत. ज्या व्यक्तीने हे खाते हॅक केले होते तो व्यक्ती कंगनाशी ऋतिक असल्याचे सांगून बोलत होता. यात ऋतिकच पीडित आहे.
- ऋतिकने याबाबत दोन वर्षापूर्वीच एक केस दाखल केली होती. त्यात कंगनाचे नाव घेतले गेले नव्हते.
- ऋतिकच्या मित्रांनी सांगितले की, ऋतिक या वादात कंगनाला अजिबात ओढू इच्छित नव्हता. मात्र, ऋतिकने त्या हॅकरपासून लांब राहा असे सांगूनही कंगना त्या अज्ञातच्या हॅकरच्या टचमध्ये राहिली.
- आता ऋतिक यामुळे डिस्टर्ब आहे की, कंगनाने तक्रार दाखल केल्याने तिचे व तिच्या बहिणीचे नाव घेतल्याने गैरसमज झाला आहे. कंगना ऋतिकच्या नीयतीवर संशय घेत आहे. त्यामुळे कंगना पोलिसांत जबाब नोंदवत नाहीये.
ऋतिक कंगनावर का आहे नाराज..
- यावर्षी जानेवारीच्या अखेर एका मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आले होते, की तिने हृतिकमुळे 'आशिकी 3' सोडला?
- कंगनाने उत्तरात सांगितले, 'हो मीसुध्दा अशा अफवा ऐकल्या आहेत. मला नाही माहित सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटी मिळवण्यासाठी असे कृत्य का करतात. माझ्यासाठी त्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. मला त्यांची पुनरावृत्ती करायची नाहीये.'
- यानंतर ऋतिकने कंगनाला नोटिस पाठवली. कंगनाने 21 पानाचे पज्ञ लिहत ऋतिकला उत्तर दिले होते.
तिस-या व्यक्तीमुळे दोघांत भांडण-
मुंबईतील डीसीपी ( सायबर गुन्हे) एम. राजकुमार यांनी सांगितले की, ही तक्रार एका अज्ञात आरोपीबाबत आहे. आम्ही त्याचा शोध घेत आहोत. मात्र, माध्यमांशी याबाबत आता माहिती शेअर उचित ठरणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, कंगनाला वाटते ऋतिकला अटक व्हावी..
कंगनाला भीती आहे तिचे ऋतिकसोबतचे काही खास फोटो सुर्कूलेट होण्याची...