आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिकची Ex-Wife सुझानवर 1.87 कोटी रुपयांच्‍या फसवणूकीचा गुन्‍हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी व प्रसिद्ध डिझायनर सुझान खान हिच्‍याविरोधात पणजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1.87 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सुझान खान अडचणीत सापडली आहे.
- एमजी प्रॉपर्टीज या रिअल इस्टेट फर्मच्या तक्रारीनुसार सुझानने आर्किटेक्ट असल्याचे भासवून कंपनीसोबत करार केल्याचे म्हटले आहे.
- एमजी प्रॉपर्टीजचे मॅनेजिंग पार्टनर मुधित गुप्ता यांनी तक्रार दाखल केली.
- सप्टेंबर 2013 मध्ये कंपनीने तिच्याशी आर्किटेक्चरल आणि डिझायनिंग सेवांसाठी लिखित करार केला होता, अशी माहिती आहे.
- उत्तर गोवा येथील तिसवाडीमधल्या सिरिदाओत बांधल्या जाणाऱ्या नायरा कॉम्प्लेक्ससाठी हा करार झाला होता.
- करारात ठरवण्‍यात आलेल्‍या कालावधीत काम पूर्ण करण्यास सुझान अपयशी ठरली, असे तक्रारीत म्हटले आहे.
- ही तक्रार नोंदवण्यास पोलिस टाळाटाळ करत होते, त्यामुळे आपण कोर्टात धाव घेतली, असेही गुप्ता यांनी सांगितले.
- यासंदर्भात सुझान खानकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुझान खानचे स्टायलिश फोटो.....
बातम्या आणखी आहेत...