आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगना म्हणाली- स्वतःला Silly Ex सिद्ध करु इच्छितो ऋतिक, काय आहे वाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगाने एका मेलमध्ये म्हटले होते, की तिला लहानपणापासून ऋतिक आवडतो. - Divya Marathi
कंगाने एका मेलमध्ये म्हटले होते, की तिला लहानपणापासून ऋतिक आवडतो.
मुंबई- ऋतिक - कंगना ईमेल हॅकिंग वादामध्ये दोघांकडूनही परस्पर विरोधी वक्तव्ये सुरु झाली आहेत. ऋतिकने पोलिसांकडे पुरावे म्हणून सादर केलेल्या ईमेल्सवर कंगनाने आपल्या वकिलांच्या माध्यमातून हल्ला केला आहे. कंगनाचे म्हणणे आहे, 'अनव्हेरिफाइड ईमेल्स लीक केले जात आहेत. यातून सिद्ध होते की ऋतिक कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि तो स्वतःला 'सिली एक्स' करु इच्छित आहे.' याआधी कंगनाचे अनेक कथित ईमेल्स उघड झाले आहेत. एका मेलमध्ये कंगनाने लिहिले होते, तुझे शांत राहाणे आता असह्य होत आहे.


काय आहे सिली एक्स वाद आणि कंगनाचे कोणते ईमेल्स उघड झाले...

- ऋतिकचे वकील दीपेश मेहतांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँचला 40 इमेल सुपूर्द केले होते.

कंगना आणि ऋतिकने वेगवेगळे - निवेदन प्रसिद्ध करुन म्हटले होते, की त्यांचे ईमेल अकाऊंट हॅक झाले होते. हे त्या संबंधीत प्रकरण आहे.
- या दोघांमधील वाद तेव्हा सुरु झाला, जेव्हा तिला विचारले की 'आशिकी 3' मधून तिला कोणी बाहेर केले.
- त्यावर कंगना म्हणाली होती, 'मला माहित नाही सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटीसाठी असेही करु शकतात.'
- त्यानंतर ऋतिकने ट्विट करुन म्हटले होते, की या अभिनेत्रीपेक्षा त्याचे पोपसोबत अफेअर होण्याचे चान्सेस जास्त आहेत.
काय म्हणाली कंगना
कंगनाने तिचे वकील रिजवान सिद्दीकी यांच्यामाध्यमातून एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.
- त्यात म्हटले आहे, की खासगी फॉरेन्सिक अहवालानंतर काही न तपासलेले आणि ऑऊट ऑफ कॉन्टेक्स्ट ईमेल्स प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
- अखेर यातून सिद्ध झाले आहे, ऋतिक कोणत्याही थराला जाऊ शकतो.
- कंगना म्हणते, 'मी कधीच म्हटले नाही की ऋतिक सिली एक्स आहे. जर त्याचे नावच घेतले नाही तर तो हा दावा का करत आहे की तो सिली एक्स आहे.'
ऋतिकच्या वकीलांचा दावा
- वकीलाचा दावा आहे, की हे सर्व मेल कंगनाने ऋतिकला त्याच्या खऱ्या मेल अॅड्रेसवर 24 मे 2014 ला पाठवले होते.
- एका इंग्रजी दैनिकाने प्रकाशित केलेल्या वृत्तात या मेलसा उल्लेख करण्यात आला आहे. त्यांची फॉरेन्सिक तपासणी देखील झाली आहे.


कंगनाने ऋतिकला पाठवलेले इमेल


1# खरचं आपल्यात प्रेम आहे ?
एका मेलमध्ये कंगना कथितरित्या विचारते, की कधी-कधी मी प्रत्येक गोष्टीबद्दल अनिश्चित असते, खरचं आपल्यामध्ये प्रेम आहे का ? की फक्त ही फँटसी आहे ? आपल्यात खरोखर प्रेमाचे नाते आहे की मी फक्त एखाद्या काल्पनिक व्यक्तीसोबत बोलत राहाते ?
2# मी सिन्ड्रॉमची शिकार आहे
कंगनाने लिहिले होते, मला लक्षात आले आहे की मला Asperger's Syndrome आहे. त्यामुळे मी तणावात आहे. जर तुला वेळ मिळाला तर नक्की वाच. मी या सिन्ड्रॉमची 98% शिकार आहे.

3# बालपणी तुला पाहिल्यानंतर सर्व काही विसरले होते
मी जेव्हा लहान होते, तेव्हा मनालीच्या एका हिंदी वृत्तपत्रात तूला प्रथम पाहिले होते. तेव्हा मी स्वतःलाही विसरुन गेले होते. त्यानंतर स्वतःलाच सांगितले होते, हा फक्त माझ्यासाठी आहे.

4# वास्तवापासून सावरू शकेल ?
एका मेलमध्ये कंगनाने लिहिले आहे, 'काय होईल जर एक दिवस आपली भेट झाली आणि तू म्हणाला की मला काहीच भेटले नाही ? एवढेच नाही तर तू मला ओळखले देखील नाही, तुझे माझ्यावर प्रेम नसेल, तेव्हा मी काय करु ? या वास्तवाचा मी कसा स्विकार करणार आणि त्यातून कशी सावरु ?'
काय आहे Asperger's Syndrome
- हा एक रोग आहे ज्यामध्ये सोशली इन्टरॅक्ट होण्यात आणि कम्यूनिकेट करण्यात अडचणी येतात.
- याला ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर (ASD) देखील म्हटले जाते.
- वास्तविक यावर फारकाही उपचारांची गरज नसते. हा रोग झालेल्या व्यक्तीचे शरीर थोडे बेडौल होते आणि भाषेवर ताबा राहात नाही.
- याची लक्षणे वयाच्या दोन वर्षांपासून जवळपास प्रत्येक वयाच्या व्यक्तीत दिसू शकतात.
पुढील स्लाइडमध्ये,
>> काय आहे दोघांमधील वाद
>> एफआयआरमध्ये केव्हा आले कंगनाचे नाव
>> ऋतिकने नाही दिले ईमेलला उत्तर
>> कंगनाच्या मेल्सचे स्क्रिन शॉट्स