आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video+Pix: मोस्ट अवेटेड ‘मोहेंजोदारो’चा ट्रेलर रिलीज, बघा हृतिकचा कधीही न पाहिलेला अवतार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता हृतिक रोशन आणि पूजा हेगडे यांच्या बहुप्रतिक्षीत ‘मोहेंजोदारो’ सिनेमा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. 'लगान' आणि 'जोधा अकबर' या सिनेमांचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी ब्रिटीशांचे राज्य, मुघल, ख्रिस्ती, अलेक्झांडर येण्यापूर्वी भारत देश हा ‘मोहेंजोदारो’ या प्राचीन संस्कृतीसाठी ओळखला जातो असे दाखविण्यात आले होते.
हृतिकने मगरीसोबत दिलेला डोळे दिपवणारा अॅक्शन सीन तर या ट्रेलरमध्ये पाहावयास मिळतोच. पण त्याचसोबत हृतिक आणि पूजाची लाजवाब केमिस्ट्रीही यात दाखविण्यात आली आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या 12 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होतोय.
पुढील स्लाईड्सवर बघा, बहुप्रतिक्षीत ‘मोहेंजोदारो’ सिनेमा ट्रेलर आणि सोबतच खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...