आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'काबिल'चा ट्रेलर रिलीज, ब्लाइंड कपलच्या भूमिकेत दिसले हृतिक-यामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार हृतिक रोशनच्या सस्पेंस थ्रिलर ‘काबिल’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. दोन दृष्टिहीन प्रेमीयुगुलींची प्रमकथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. दोघेही प्रेमातून एकमेकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र त्यांच्या कहाणीत अचानक खलनायकाची एंट्री होते. त्यानंतर सिनेमात खरा सस्पेंस असण्याची शक्यता आहे. सिनेमात हृतिकने व्हॉइस ओव्हर अॅक्टरची भूमिका साकारली आहे. तर रोहित रॉय आणि रोनित रॉय हे सख्खे भाऊ व्हिलनच्या भूमिकेत आहेत.
सिनेमातील डायलॉग, अॅक्शन आणि सस्पेंस जबरदस्त असल्याचं ट्रेलरमधून दिसत आहे. या सिनेमात हृतिकसोबत अभिनेत्री यामी गौमत मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाचं दिग्दर्शन संजय गुप्ता यांनी केलं आहे. पुढील वर्षी म्हणजे 26 जानेवारी 2017 ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पुढील स्लाईडमध्ये बघा, सिनेमाचा ट्रेलर...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...