आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसला बिहारी समजायचे लोक, रेपच्या न्यूजवर आई वडील द्यायचे हा सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - हुमा कुरेशी लवकरच तिचा भाऊ साकिबसह 'दोबारा'या चित्रपटात झळकणार आहे. या हॉरर फिल्ममध्ये दोघे भाऊ बहिणीच्या भूमिकेत असतील. फिल्म प्रमोशनसाठी लखनऊमध्ये पोहोचलेल्या हुमाने आमच्याशी बातचीत करताना तिच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर केल्या. 

एखाद्या मुलीचा रेप झाला की, आई वडील द्यायचे हा सल्ला 
- हुमा सांगते, मी दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमध्ये राहणारी मुलगी आहे. आमच्या कुटुंबात कोणाचाही चित्रपटांशी काहीही संबंध नव्हता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी मुंबईला आले आणि जुहूमध्ये एका फ्लॅटमध्ये भावाबरोबर राहू लागले. 
- वडिलांचा फूड बिझनेस आहे. दिल्लीत त्यांच्या रेस्तरॉच्या अनेक ब्रँचेस आहेत. माझी लाईफ सेट व्हावी असे त्यांना वाटायचे. मला मला स्वतःला माझी ओळख निर्माण करायची होती. 
- अनेकदा प्रयत्न करूनही मॉडेलिंग एजन्सीने मला साईन केले नाही. मी पहिली अॅड अभिषेक बच्चनबरोबर केली होती. तिचे मला 5 हजार रुपये मिळाले होते. 
- मला आठवते मी 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये काम केले तेव्हा लोक मला बिहारी समजायचे. मला इंग्रजी येत नव्हते. पण मी कधी बिहारलाही गेलेली नाही. 
- माझे पॅरेंट्स पेपर वाचायचे तेव्हा एखाद्या मुलीच्या बलात्काराची किंवा छेडछाडीची बातमी वाचायचे तेव्हा ते मला म्हणायचे, घरी लवकर ये, असे कपडे घालू नको, असे करू नको, तसे करू नको. त्यांना काळजी वाटायची पण मला ते चूक वाटायचे. 
- मला वाटायचे फक्त मुलींना नाही, मुलांनाही समजवायला हवे. 
- साकिबबाबत हुमा सांगते, माझ्या भावाला क्रिकेट आवडते. यापूर्वी त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. पण दोघे एकत्र प्रथमच काम करत आहेत. 
- आम्ही सेटवरच भांडण करायला नको या भितीने आमचे आई वडील घाबरलेले होते, असे हुमा सांगते. 

असा आहे 'दोबारा'
- हुमा सांगते 'दोबारा' हा चित्रपट इंग्रजी चित्रपट 'ओकुलस'वरुन प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. हा हॉरर चित्रपट आहे. मी आणि साकिब लहानपणी खूप हॉरर चित्रपट पाहायचो. हा चित्रपट भाऊ बहिणीची कथा आहे. लहानपणी अघातात त्यांचे संपूर्ण कुटुंब नष्ट होते. 
- चित्रपटात मी एक गाणेही गायले आहे. एका सीनमध्ये बेसूर गायकाची डिमांड होते. दुसरे कोणी गायले तर त्याला पैसे द्यावे लागतील असे मला सांगण्यात आले. त्यामुळे मी ते गायले. 
- लखनऊबाब ती सांगते, जॉली एल.एल.बीच्या शुटिंगवेळी तिने याठिकाणी भरपूर वेळ घालवला. मी देवा शरीफ मजारवरही गेले होते. लपून लपून शुक्ला की चाट, बिरयाणी खाल्ली आणि मार्केटींगही केले. 

हुमा कुरेशीचे फोटोज पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...
बातम्या आणखी आहेत...