आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Am Safe, Tweets Genelia D'Souza After Bangkok Bomb Blast

बँकॉकच्या अतिरेकी हल्ल्यातून थोडक्यात बचावली जेनेलिया, ट्विट करुन सांगितले, 'I am Safe'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेनेलिया देशमुखचे ट्विट. - Divya Marathi
जेनेलिया देशमुखचे ट्विट.

सहसा शांत असलेल्या थायलंडची राजधानी बँकॉकच्या ब्रह्म मंदिरासमोर सोमवारी सांयकाळी भीषण बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यातून बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुजा थोडक्यात बचावली आहे. जेथे बॉम्ब स्फोट झाला, तेथून काही अंतरावरच जेनेलिया हजर होती. तिने ट्विटरवरुन सुखरुप असल्याचे कळवले आहे. तिने ट्विट केले, ''मॉलसमोरच स्फोट झाला. आम्ही आत आहोत. धमाका ऐकायला आला. आम्ही सुखरुप आहोत, पण धास्ती वाटते.'' (Bomb set off just opp the mall we are currently in -can hear the sirens blazing all over- we are safe but feel terrible for the lives lost.)
जेनेलिया बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. रितेश एका जाहिरातीच्या शूटिंगच्या निमित्ताने बँकॉकमध्ये असून जेनेलिया त्याच्यासोबत आहे. या घटनेनंतर रितेशने ट्विट केले, "My thoughts go out to the people affected by last night’s cowardly attack. Taking innocent lives is no way to protest or make a point."
रितेशने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ब्लास्टनंतर रस्त्यावर पोलिसांच्या गाड्या दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करुन त्याने लिहिले, "Bangkok -right across the street."
पुढे स्लाइडमध्ये पाहा, रितेश देशमुखचे ट्विट...