आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Twitter वर टीकेची झोड उठल्यानंतर ऋषी कपूर म्हणाले, 'मी भारतात खात नाही गोमांस'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः ऋषी कपूर, खालच्या बाजुला ऋषी कपूर यांनी केलेले ट्विट)
मुंबईः महाराष्ट्रात गोमांस विक्री आणि खाण्यावर बंदी करण्यात आल्यावर हे प्रकरण देशातच नाहीतर परदेशातही चांगलंच गाजलं. काहींनी समर्थन केलं तर जास्तीत जास्त लोकांनी या बंदीवर टिका केली. यात बॉलिवूड कलाकारांचाही समावेश होता. अभिनेता ॠषी कपूर यांनी याबाबत आपले तोंड उघडले होते. त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते, की “मला राग येतोय. खाण्याला तुम्ही धर्माशी का जोडत आहात? मी बीफ(गोमांस) खाणारा एक हिंदू आहे. याचा अर्थ असा आहे का? की, मी बीफ न खाणा-या हिंदूपेक्षा कमी धार्मिक आहे? विचार करा…!!” या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्यांना नास्तिक म्हटले आहे.
आता ऋषी कपूर यांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले ऋषी कपूर
ऋषी कपूर यांनी गोमांस खात नसल्याचा इंकार केलेला नाहीये. त्यांनी सांगितले, की ते भारतात गोमांस खात नाही. मात्र परदेशात गेल्यानंतर ते ब्रीड कॅटलचे बीफ आवर्जुन खातात. भारतात मीटमध्ये ब्रीड कॅटलचा उपयोग केला जात नाही. भारतात मुळीच गोमांस खात नसून त्यांच्या घरातदेखील कुणालाही ते खाण्याची परवानगी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऋषी यांच्या मते, भारतातील 90 टक्के हिंदू लोक गायीपासून तयार झालेल्या प्रॉडक्ट्सचा उपयोग करतात. त्यांनी पुढे म्हटले, की बीफसाठी तो गायीची हत्या करु शकत नाही.
चुकीच्या पद्धतीने काढण्यात आला अर्थ
ऋषी यांनी म्हटले, त्यांच्यावर उठलेली टीकेची झोड अयोग्य आहे. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. प्रत्येक जण त्यांना निशाण्यावर घेत आहेत. मात्र त्यांनी आपल्या चाहत्यांना या वादाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सांगितले आहे. मी असे काय म्हटले ज्यावर एवढा गोंधळ निर्माण झाला, असा प्रश्न त्यांना उपस्थित केला आहे. त्यांच्या आणि कुटुंबीयांविषयी अपशब्दांचा उपयोग केला जातोय. हिंदू धर्मात बीफ खाण्याची परवानगी नाहीये. मात्र माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करण्याचा अधिकार इतरांना कुणी दिला? मी तुमच्या विचारांशी सहमत नाही म्हणून असे घडतंय का? हीच आपली परंपरा आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले असून ते पुढे म्हणाले, मी गायीचा खूप आदर करतो, कारण तिच्यापासून आपल्याला दूध, दहीसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी मिळतात.
लोकांना अपील
ऋषी कपूर यांनी खाण्यापिण्याच्या गोष्टींना धर्माशी न जोडण्याची अपील करत म्हटले, की काय खावे आणि काय खाऊ नये, ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. त्यांच्या मते, चांगले कर्म लोकांना महान बनवतात. सर्व धार्मिक गोष्टींचा आपण आदर करत असल्याचे त्यांनी म्हटले.
त्यांनी सांगितले, की इतरांप्रमाणे ते देखील होळी, दिवाळी आणि गणेशोत्सव साजरा करतात. ऋषी यांनी पुन्हा म्हटले, की बीफ खाण्याचे मी समर्थन करत नाहीये, मात्र विचार व्यक्त करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असायला हवे.
काय होते प्रकरण?
काही दिवसांपूर्वी गोहत्या बॅनला ऋषी यांनी आपला विरोध दर्शवला होता. त्यावेळी आपण गोमांस खात असल्याचे त्यांनी सांगितले होते. लोकांना हे समजताच त्यांनी त्यांच्यावर बरीच टीका केली होती. ट्विटरवर अनेकांनी त्यांनी देशद्रोही आणि डुक्कर संबोधले होते.
पुढे वाचा, ऋषी कपूर यांच्याविरोधात लोकांनी केलेले Tweets..​