आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Don't Expect People To Know My Name: Arvind Swamy

लोकांनी ओळखावे ही अपेक्षाच नाही; अभिनेता अरविंद स्वामीचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकांनी मला ओळखावे, अशी माझी कधीही अपेक्षा नव्हती आणि राहणार नाही, असे मत अभिनेता अरविंद स्वामी याने नुकतेच व्यक्त केले आहे. अरविंद "डिअर डॅड' या चित्रपटातून पुनरागमन करत आहे.

करिअरच्या सुरुवातीलाच "रोजा' आणि "बॉम्बे' चित्रपटातून घराघरांत पोहोचलेल्या अरविंद स्वामीकडे या दोन चित्रपटांनंतर मोजकेच चित्रपट वाट्याला आले. त्यानंतर जे काही चित्रपट त्याने केले तेही फ्लॉप झाले. अरविंद म्हणाला, ज्या वेळी माझे चित्रपट हिट झाले त्या वेळीही लोकांनी मला ओळखावे, अशी माझी कधीच अपेक्षा नव्हती आणि आजही नाही. माझ्यासाठी स्टारडमची व्याख्या वेगळी आहे. मी स्वत:ला ओळखतो हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या डिअर डॅड हा चित्रपट मी करत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. ९० च्या दशकामध्ये अरविंद आणि मधू यांच्या "रोजा' चित्रपटाने देशात बंपर यश मिळवले होते.

या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले होते. त्यानंतर मुंबई दंगलीवर आधारित आलेल्या "बॉम्बे' चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाबाबत त्या वेळी खूप वादही झाले होते. त्यानंतर अरविंद याच्याकडे चांगले चित्रपट येण्याची अपेक्षा होती. मात्र, यानंतर आलेले त्याचे चित्रपट सलग फ्लॉप झाले आणि बंपर हिट देणारा अभिनेता बॉलीवूडच्या विस्मरणात गेला.

अपघातातून सावरलो
काही वर्षांपूर्वी आपला अपघात झाला होता. त्यामुळे अनेक महिने आपल्याला आराम करावा लागल्याचे त्याने सांगितले. तसेच पत्नीसोबत घटस्फोट झाल्यानंतर माझ्यावर मुलांची जबाबदारी आली. त्यामुळे त्यांच्याकडे मी प्राधान्याने लक्ष देतो, असेही सांगितले.
बापाची भूमिका |"डिअर डॅड’ या चित्रपटात बापलेकांत असलेले भावनिक नाते दाखवण्यात आले आहे. अरविंद यात नितीन स्वामिनाथन नावाचे पात्र साकारत आहे. आपल्या मुलासाठी काहीही करण्यास तयार असलेल्या बापाभोवती चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तनुज भरमार यांनी केले आहे.