आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दंगल\'साठी आमिरने वाढवले 30 किलो वजन, आता 4 महिन्यांत कमी करणारा बॉडी फॅट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'पीके' सिनेमासाठी आमिर खानने सिक्स पॅक अॅब केले होते. पुन्हा 'दंगल'साठी त्याने 30 किलो वजन वाढवले. त्याचा मागील रिलीज आणि आगामी सिनेमाचे शूटिंग यामध्ये एक वर्षांचा गॅप झाला आहे. त्याला 90 किलो वजन वाढवण्यासाठी काही वेळ हवा होता.
आता खास गोष्ट अशी आहे, की 'दंगल'च्या इतर दृश्यांसाठी त्याला आपले वजन काही महिन्यांतच कमी करावे लागणार आहे. पुढील महिन्यापासून व्हॅनितेश तिवारीच्या दिग्दर्शनाखाली या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे.
आमिरने पुष्टी केली, 'आम्ही सप्टेंबरमध्ये शूटिंग सुरु करणार आहोत. डिसेंबरपर्यंत सतत शूट चालणार आहे. पुन्हा मला वजन कमी करावे लागणार आहे.' परंतु तो वजन वाढवण्यापूर्वीच वजन कमी असलेले सीन्स शूट करू शकत होता, असे विचारल्यानं तर तो हसला. आमिर म्हणाला, 'मला हिच पध्दत आवडते. मला चार महिन्यांत 9 टक्के बॉडी फॅटपर्यंत पोहोचायचे आहे. 'धूम 3'मध्ये माझा जसा लूक होता. या सिनेमात माझा तो दुसरा लूक असेल. वजन कमी केल्यानंतर या लूकमध्ये मी मे महिन्यात शूटिंग करेल. कायापलट करण्यासाठी मला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे चार महिने लागतील. या कालावधीत मी शूटिंग नाही करू शकणार त्यावेळेत मी अनेक स्क्रिप्ट वाचू शकेल. स्क्रिप्ट वाचेल आणि भविष्याचे प्लानिंगही होईल.'