आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Wanted To Make Akele Hum Akele Tum With Anil,Says Mansoor Khan

आमिरला करायची होती \'जोश\' सिनेमातील शाहरुखची भूमिका, दिग्दर्शकाने दिला नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: आमिर खानचे कजिन आणि प्रसिध्द दिग्दर्शक मन्सूर खान सध्या कुन्नूरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतात. 'कयामत से कयामत तक', 'जो जीता वही सिकंदर' आणि 'जोश'सारखे अनेक हिट सिनेमे देणा-या मन्सूर यांनी आमिरच्या 51व्या वाढदिवसानिमित्त Dainikbhaskar.comसोबत खास बातचीत केली. यादरम्यान त्यांनी आमिर आणि त्याच्या फिल्मी करिअरशी निगडीत काही गोष्टी शेअर केल्या.
Q- काही निर्माते आमिरच्या सल्ल्याला हस्तक्षेपाचे नाव देतात. त्यामुळे डिफरेन्सेस होतात? तुमच्यात आणि आमिरमध्ये कधी असे डिफरेन्सेस राहिले?
- हो, 'अकेले हम अकेले तुम' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान आमच्या असे मतभेद निर्माण झाले होते. सिनेमात एक सीन होता, मनीषा आमिरचे घर सोडून जाते. मला हा सीन स्टेबलिश करण्यासाठी आणखी दोन सीन टाकायचे होते. परंतु आमिरची अशी इच्छा नव्हती. म्हणून आम्ही आमिरचे मत घेतले आणि ते सीन सिनेमात ठेवले नाही. आजही मला याचा पश्चाताप होतो, की मी ते सीन का टाकले नाहीत. कारण ते सीन्स प्रेक्षकांवर प्रभाव टाकणार होते.
Q ‘अकेले हम अकेले तुम’मध्ये आमिर खान आणि मनीषा कोईरालाचे कास्टिंग कसे झाले?
- खरं सांगायचे झाले तर, या सिनेमासाठी माझी पहिली पसंत नव्हता. मला वाटत होते, की आमिर या पात्रासाठी जास्तच तरुण होता. मला या भूमिकेसाठी अनिल कपूरला घ्यायचे होते. अनिलच्या अपोझिट माधुरी दीक्षितला साइन करायचे होते. अनिल सिनेमाविषयी खूप उत्साही होते. परंतु माधुरी दुस-या प्रोजेक्ट्समध्ये बिझी होती. म्हणून मी दोघांना घेण्याऐवजी आमिर आणि मनीषाला कास्ट केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, आमिरचे पहिल्याच सिनेमात कसे झाले कास्टिंग...