आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांमध्ये कंगना होणार विवाहबद्ध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंगना रानोटने सध्या लग्नबंधनात अडकण्याचा पुरेपूर विचार केलेला दिसतो. एका मुलाखतीमध्ये नेहमी टाळणाऱ्या या प्रश्नावर तिने बिनधास्त संवाद साधला. कंगनाने म्हटले की, ‘लग्न तर मला करायचे आहेच, पण ते तीस वर्षांच्या आत. सध्या माझे वय २८ वर्षे असून एक-दोन वर्षांत मी मॅरिड लाइफला सुरुवात करेन. त्यामुळे आता निदान या विषयावरून तरी मला कोणी छेडू नये.’
कंगना ज्याच्याशी लग्न करेल तो इंडस्ट्रीशी संबंधित असेल की नाही याचा अद्याप खुलासा झालेला नाही. कंगना आपला जीवनसाथी म्हणून कोणाची निवड करेल हे तिचे मित्र कुटुंबीयदेखील सांगू शकत नाही. त्यामुळे कंगनाने लग्नाच्या विषयावर बोलून चाहत्यांना आणि कुटुंबीयांना ऑक्सिजनवर ठेवले एवढे मात्र नक्की.