आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर म्हणाला, \'भारत सर्वात चांगला, 2 आठवडेही मी देशाबाहेर राहू शकलो नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता आमिर खानने युटर्न घेतला आहे. आपण दोन आठवड्यांपेक्षा जास्त दिवस देशाबाहेर राहू शकलो नसल्याचे आमिरने म्हटले आहे. 'मी येथेच जन्मलो, येथेच मरणार. मी भारत कधीच सोडणार नाही', असेही अमिरने सांगितले आहे.
आमिरने का दिले असे वक्तव्य?
- आमिरने अक्षय कुमारच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
- अक्षयने आमिरचे नाव न घेता त्याच्यावर टीका केली होती. 'अप्स अँड डाऊन' कोणत्याही देशात होतेच, असे दोन दिवसांपूर्वी अक्षय कुमारने वक्तव्य केले होते.
- याचा अर्थ असा नाही, की कुणीही यावर इतके बोल्ड वक्तव्य द्यावे.
आमिर खान आणखी काय म्हणाला?
- काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला.
- काही लोकांना वाटते, की मला देश सोडायचा आहे. परंतु तुम्हाला सांगतो, यात काहीही सत्य नाहीये.
- मी येथेच जन्मलो आणि येथेच मरणार आहे. मी माझा देश सोडून दोन आठवडे सुध्दा बाहेर राहू शकत नाही. कारण मला माझ्या घराची आठवण त्रस्त करते.
- आमिर म्हणाला, जगात भारतासारखा दुसरा कोणताच देश नाहीये. मी कधीच असे म्हणालो नाही, की भारतात असहिष्णुता आहे आणि मला देश सोडायचा आहे.
- मीडियाने माझे वक्तव्य चुकीच्या पध्दतीने सादर केले.
- आपल्या देश विविध भाषा आणि संस्कृतीने भरलेला आहे. भारतासारखी विविधता इतर देशांत नाहीये.
- आमिर 2006मध्ये रिलीज झालेल्या 'रंग दे बसंती'च्या इव्हेंटवेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता.
- आमिरच्या अनेक मित्रांनी त्याच्या असहिष्णुतेच्या मुद्यावर टिका केली होती.
आमिरच्या इन्टॉलरेंसच्या कोणत्या मुद्यावर झाला होता वाद...?
आमिरने नोव्हेंबरमध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या आठवड्या रामनाथ गोयनका अवॉर्ड्स फंक्शनमध्ये म्हटले होते, की त्याला त्याच्या मुलांविषयी पहिल्यांदा भिती वाटत आहे. देशातील वातावरण पाहून एकदा त्याची पत्नी किरण रावने एक मोठी आणि भयावह गोष्ट म्हणाली होती. किरणने विचारले होते, की आपल्याला देश सोडायला हवा का? किरणला मुलांच्या सुरक्षेसाठी असुरक्षित वाटत होते.
काय आहे असहिष्णुतेचा मुद्दा?
उत्तर प्रदेशच्या दादरी गोमांस ठेवल्याच्या शंकेवरून एका व्यक्तीची हत्या केली होती. त्यापूर्वी कन्नड लेखक कलबुर्गी यांची हत्या झाली. त्यानंतर असहिष्णुतेचा मुद्दा भडकला होता. पुरस्कार वापसीला सुरुवात झाली. अनेक लेखक, निर्माते आणि वैज्ञानिकांनी देशात वाढत्या असहिष्णुतेचा विरोध दर्शवत पुरस्कार परत केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, असहिष्णुतेवर वक्तव्य देऊन वादात अडकले आहेत हे सेलिब्रिटी...