आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राधे भैय्या पुन्हा मोठ्या पडद्यावर अवतरणार, 'तेरे नाम'चा सिक्वेल येणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः तरुणाईवर भुरळ घालणारा 'राधे भैय्या' पुन्हा पडद्यावर झळकण्याची शक्यता आहे. कारण तुफान गाजलेल्या सलमान खानच्या 'तेरे नाम' सिनेमाचा सिक्वेल बनवण्याचा विचार, दिग्दर्शक सतीश कौशिक करत आहे. 'तेरे नाम'चा सिक्वेल कधी येणार हे मात्र कौशिक यांनी अद्याप गुलदस्त्यात ठेवले आहे.
सलमान खान आणि भूमिका चावला यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा 2003 मध्ये आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. सलमान खानने राधे भैय्याची तर भूमिका चावला निर्जराच्या रोलमध्ये होती. राधे भैय्याच्या हेअर स्टाईलने तर कॉलेज तरुणांवर चांगलीच भुरळ घातली होती.

'तेरे नाम'च्या सिक्वेलबाबत सतीश कौशिक म्हणाले, "माझे ट्विटर 'तेरे नाम 2' च्या मागणीने भरले आहे. माझ्याजवळ 15 कथा आहेत, ज्या लेखकांनी माझ्या सिनेमांसाठी लिहिल्या आहेत. मी काही कथा निवडल्या आहेत, मात्र जुन्या सिनेमांवर अवलंबून राहायचं का, हे मला माहित नाही."
बातम्या आणखी आहेत...