आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'देशात जे वाईट ते पुरस्कारासाठी..\' \'न्यूटन\'च्या ऑस्कर नामांकनावर भडकला IAS अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनेमेंट डेस्क - राजकुमार राव याच्या अभिनयाने सजलेल्या 'न्यूटन'या चित्रपटाची सगळीकडे वाहवा केली जात आहे. समीक्षकांसह प्रेक्षकांची पसंतीही या चित्रपटाला मिळाली आहे. त्याचमुळे या चित्रपटाची ऑस्करमधील भारताच्या एंट्रीसाठी निवड झाली आहे. पण या निर्णयाने एका आयएएस अधिकाऱ्याने संताप व्यक्त केला आहे. मध्यप्रदेशातील सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी याबाबतचा राग फेसबूकवर व्यक्त केला आहे. 

काय म्हणाले मनोज.. 
- चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशचे सांस्कृतिक विभागाचे मुख्य सचिव मनोज श्रीवास्तव यांनी फेसबूकवर संताप व्यक्त केला. मनोज यांनी म्हटले, 'देशात जे काही वाईट आहे ते पुरस्कारासाठीच आहे. मी न्यूटन चित्रपट पाहिला आहे. त्याचे ऑस्करसाठी नामांकन झाले. स्लमडॉग मिलेनियरही ऑस्करसाठी पाठवण्यात आला होता. त्यामुळे आपल्या देशाची वाईट प्रतिमा जो सादर करेल, तो पुरस्कारासाठी पात्र आहे. '
- जर सर्वकाही असेच असेल तर आपण स्वातंत्र्य वाया घालवत आहोत. 
- हा चित्रपट काय सिद्ध करतो की, आपल्या देशातील लोकशाही फक्त नावापुरती, दिखाव्यापुरती आहे. 
- चित्रपटात अधिकारी काहीही काम करत नाही असे दाखवले आहे. 
- आपण परफेक्ट नसलो तरीही पाकिस्तानही नाही आणि नॉर्थ कोरियाही नाही. एवढा फरक दिसायला हवा. 'न्यूटनमध्ये तो फरक दिसत नाही. 

न्यूटन हा चित्रपट अविभाज्य मध्य प्रदेशातील पार्श्वभूमीवर आधारित आहे. या चित्रपटात एकूणच प्रशासकीय व्यवस्थेवर भाष्य आणि टीका करण्यात आली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, न्यूटन चित्रपटाची झलक...
बातम्या आणखी आहेत...