आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IFFI : बिग बींचा ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरव, या फिल्मला मिळाला गोल्डन पिकॉक पुरस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यात झालेल्या इफ्फी सोहळ्याची मंगळवारी (28 नोव्हेंबर) सांगता झाली. मोरोक्कोत जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्‍पिलो यांच्या ‘120 बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’ म्हणजेच सुवर्ण मयुर पुरस्कार पटकावला. इफ्फीच्या समारोपाच्या दिवशी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.


1990 च्या दशकात फ्रान्समधील समलैंगिकता आणि एड्स या विषयावर हा चित्रपट भाष्य करतो. नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अर्नाल्ड व्हॅलोयस आणि अॅडेल हेनेल यांच्याही भूमिका आहेत. यंदाच्या ‘कान्स’ चित्रपट महोत्सवात हा चित्रपट पहिल्यांदा दाखवला गेला होता, तर भारतात इफ्फीमध्ये त्याचा प्रिमियर शो झाला. 40 लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

 

अमिताभ बच्चन ठरले ‘पर्सन ऑफ द इयर’...  
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाच्या इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतील ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. अक्षय कुमार आणि स्मृती इराणी यांनी अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार बहाल केला. पुरस्कार देण्यासाठी बिग बींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. तेव्हा अक्षय त्यांना घेण्यासाठी व्यासपीठावरुन खाली आला आणि त्याने बिग बींचे पाय धरले. अक्षयने त्यांच्या पाया पडताच बिग बींनी त्याला आपुलकीने मिठी मारली. तेव्हा उपस्थितांमध्येही अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य खुलल्याचे पाहायला मिळाले.


पुढील स्लाईड्सवर बघा, या सोहळ्यात कोणकोणत्या चित्रपटांनी पुरस्कार केले आपल्या नावी आणि सोबतच छायाचित्रे...  

बातम्या आणखी आहेत...