आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IFFI 2017च्या सांगता सोहळ्याला कतरिनासोबत पोहोचला सलमान, अक्षय पडला बिग बींच्या पाया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोव्यात झालेल्या इफ्फी सोहळ्याची मंगळवारी (28 नोव्हेंबर) सांगता झाली. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. अभिनेता सलमान खान कतरिना कैफसोबत या सोहळ्यात पोहोचला. मंचावर हे दोघे एकत्र होते. याशिवाय अमिताभ बच्चन, हुमा कुरैशी, अक्षय कुमार, पुजा हेगडे, करण जोहर, सोनाली बेंद्रे या कलाकारांनी सांगता सोहळ्याला उपस्थिती लावली. अभिनेते अमिताभ बच्चन यांना यंदाच्या इफ्फीमध्ये चित्रपटसृष्टीतील ‘पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.

 

अक्षय कुमार आणि स्मृती इराणी यांनी अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार बहाल केला. पुरस्कार देण्यासाठी बिग बींना व्यासपीठावर बोलावण्यात आले. तेव्हा अक्षय त्यांना घेण्यासाठी व्यासपीठावरुन खाली आला आणि त्याने बिग बींचे पाय धरले. अक्षयने त्यांच्या पाया पडताच बिग बींनी त्याला आपुलकीने मिठी मारली. तेव्हा उपस्थितांमध्येही अनेकांच्याच चेहऱ्यावर स्मितहास्य खुलल्याचे पाहायला मिळाले.


या सोहळ्यात सलमान खान स्टारर ट्युबलाइट या चित्रपटातील बालकलाकार माटिन रे तंगू हादेखील आवर्जुन हजर होता. या सोहळ्यात ‘120 बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने  सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’ म्हणजेच सुवर्ण मयुर पुरस्कार पटकावला. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने बिग बींच्या गाजलेल्या गाण्यांवर सादरीकरण केले. 


पाहुयात, इफ्फी 2017 च्या सांगता सोहळ्याची ही खास क्षणचित्रे... 

बातम्या आणखी आहेत...