आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षय कुमारच्या ऑनस्क्रिन पत्नीने केला होता आत्महत्येचा विचार, समोर आले कारण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डिक्रूज एकेकाळी प्रचंड डिप्रेशनमध्ये होती. याकाळात तिच्या मनात आत्महत्येचा विचारसुद्धा डोकावला होता. डिस्मॉर्फिक डिसऑर्डरने ती ग्रस्त होती. चित्रपटसृष्टीत आपल्याला सुरुवातीच्या दिवसांमध्ये कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला होता आणि कशा प्रकारे आपल्या मनात नकारात्मक विचार येत होते, याविषयीचा उलगडा तिने केला. ‘मेंटल हेल्थच्या 21 व्या वर्ल्ड काँग्रेस’च्या शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ती बोलत होती. इलियानाने साऊथसोबतच अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2016 साली आलेल्या अक्षय कुमार स्टारर 'रुस्तम' आणि अजय देवगण स्टारर 'बादशाहो' या चित्रपटांमध्ये ती झळकली. 

इलियानाने आपले अनुभव शेअर करताना सांगितले, ‘बऱ्याचदा लहानसहान गोष्टींमुळे माझ्या मनात संकोचलेपणाची भावना यायची. त्यावेळी माझ्या अंगकाठीमुळे मला बऱ्याच गोष्टी सतावत होत्या. माझ्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड होता. मी त्यावेळी खूपच हताश असायचे. कारण त्यावेळी मला कल्पनाच नव्हती की, मी नैराश्य आणि ‘बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डर’ने ग्रासलेले होते. त्यावेळी लोकांनी माझा स्वीकार करावा असेच मला वाटत होते."
 
पुढे वाचा, आणखी काय सांगितले इलियानाने...
बातम्या आणखी आहेत...