आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमजानमध्ये कसा असतो जगभरातील मुस्लिमांचा दिवस, पाहा 10 Photos मधून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कीच्या ओल्ड स्ट्रीटवर रोजा सुटण्यापूर्वी सेल्फीसाठी पोज देताना महिला. - Divya Marathi
तुर्कीच्या ओल्ड स्ट्रीटवर रोजा सुटण्यापूर्वी सेल्फीसाठी पोज देताना महिला.
जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजानचा महिना सध्या सुरू आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार दरवर्षी 9 व्या महिन्यात रमजान येतो. यादरम्यान जगभरातील मुस्लिम बांधव सकाळपासून सायंकाळपर्यंत अन्न पाण्याशिवाय उपवास करत असतात. हा महिना केवळ पुण्याकर्मासाठी आहे असे मानले जाते. संपूर्ण मानवजातीमध्ये प्रेम, सद्भावना आणि मानवतेचा संदेश या महिन्यात पोहोचवला जातो. कुराणानुसार या पवित्र महिन्यात ईश्वर त्याच्या भक्तांवर कृपा करत असतो आणि उपवास केल्याने पाप नष्ट होत असतात. या पवित्र महिन्यात नरकाचे दार बंद असते आणि जन्नतकडे जाणारा मार्ग मोकळा होतो, असेही म्हणतात. रमजानदरम्यान जगभरातील मुस्लिमांचा दिवस कसा असतो हे आपण आज पाहणार आहोत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील रमजानचे PHOTOS...