आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी केली आत्महत्या, कुणाचा अपघाती झाला मृत्यू, 40 वर्षेही जगू शकले नाही हे सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'निशब्द' आणि 'गजनी' या सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण लागले आहे. गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पुरावे असले तरी ती गंभीर बाब असून तो एक नियोजित कट आहे, असा खुलासा इंग्लंडच्या तज्ज्ञांनी केला आहे. जिया खानच्या मानेवर आणि चेहऱ्यावर खुना आढळून आल्या असून ही आत्महत्येचे गंभीर प्रकरण आहे, अशा स्पष्ट शब्दांत न्यायवैद्यक तज्ज्ञांनी अहवालात म्हटले आहे. तीन वर्षापूर्वी म्हणजे ३ जून २०१३ रोजी जिया खानचा मृतदेह गळफास घेतलेल्या आवस्थेत आढळून आला होता. माध्यमांनी जिया खानने आत्महत्या केल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. मात्र, जिया खानच्या आईने मात्र जियाची हत्या झाल्याचा दावा केला होता.
अनेक सेलेब्सने कमी वयातच घेतला जगाचा निरोप...
जिया खानच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स आहेत ज्यांनी कमी वयात जगाला अलविदा म्हटले. कुणी 19व्या वर्षी तर कुणी 25व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. या पॅकेजच्या माध्यमातून एक नजर टाकूया अशाच काही सेलिब्रिटींविषयी जे 40 वर्षेसुध्दा जगू शकले नाहीत.

प्रत्युषा बॅनर्जी
'बालिका वधू' या मालिकेत आनंदी हे पात्र साकारुन प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रत्युषआ बॅनर्जीने वयाच्या 24 व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. याचवर्षी एप्रिल महिन्यात ही घटना घडली. प्रत्युषाने 'बालिका वधू' शिवाय 'बिग बॉस 7', 'किचन चॅम्पियन 4', 'झलक दिखला जा 7' आणि 'पॉवर कपल' या रिअॅलिटी शोजमध्ये काम केले होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, आणखी सेलिब्रिटींविषयी ज्यांनी कमी वयातच घेतला जगाचा निरोप...
बातम्या आणखी आहेत...