आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्कमध्ये निघाली 'इंडिया डे परेड', बाहुबलीच्या प्रेयसीसह हजारो लोकांना लावली उपस्थिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/न्यूयॉर्क - भारताच्या 71 व्या स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष करत न्यूयॉर्क येथे भारतीय परेड काढण्यात आली. या परेडमध्ये बाहुबली चित्रपटातील अभिनेता राणा डुग्गुबाती आणि तमन्ना भाटीया यांनी उपस्थिती लावली. यावेळी पारंपरिक भारतीय वेशभुषेत सर्वजण दिसले. ही परेड भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या सर्वात मोठ्या परेडपैरी एक आहे. मेडिसन एवेन्यूपासून अनेक रस्त्यांवर झाली परेड..
 
- न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार, 37 वी भारतीय परेड न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्टीकटच्या इंडियन एसोसिएशंस फेडरेशनतर्फे आयोजित करण्यात आली होती. ही परेड रविवारी मेडिसन एवेन्यूच्या रस्त्यांवरुन काढण्यात आली. 

- परेडमध्ये अनेक भारतीय-अमेरीकी ऑर्गनाइजेशंस सहभागी झाले होते. यावेळी लहान मुलांनी काही कार्यक्रम सादर केले. याशिवाय मार्च बँड आणि पोलिसही यात सहभागी झाले होते. 
- परेडमध्ये सहभागी लोकांना अभिवादन करत न्यूयॉर्कचे मेयर बिल डी ब्लेसियो यांनी म्हटले की, इंडिपेंडंस डे परेड भारतीय-अमेरिकन लोकांना शहरासाठी दिलेल्या योगदानानिमित्त त्यांचे आभार मानण्यासाठी काढली जाते. यावेळी बिल यांनी हातात तिरंगा हलवून सर्वांचे अभिवादन केले.  
 
माझ्यासाठी ही गर्वाची गोष्ट..
- परेडचा ग्रँड मार्शल राणा डुग्गुबातीने सांगितले की, भारतीय अमेरिकन लोकांसोबत स्वतंत्रता दिवस साजरा करणे माझ्यासाठी आफर गर्वाची गोष्ट आहे. माझ्या देशासाठी येथे येऊन मला फार अभिमान वाटत आहे. येथे जे कोणी लोक आहेत ते आपल्या देशाचे ब्रँड अॅम्बेसेटर आहेत. जे आपल्या भारताचे नाव मोठे करण्याचे काम करतात. 
 
- तमन्ना भाटीयाने सांगितले की, देशाची संस्कृती आणि वारसा जपणाऱ्या भारतीय अमेरिकी लोकांना पाहणे फारच गर्वाचे आहे. या परेडमध्ये भारताचे प्रतिनीधीत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल फार छान वाटत असल्याचे तिने सांगितले.   
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, या परेडदरम्यानची काही खास छायाचित्रे..
बातम्या आणखी आहेत...