आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली 2'ने तोडला 'दंगल'चा रेकॉर्ड, ठरला Highest Grosser हिंदी सिनेमा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 28 एप्रिल रोजी रिलीज झालेल्या 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने अवघ्या 14 दिवसांत भारतीय बॉक्स ऑफिसवर 'दंगल'च्या एकुण कलेक्शनला मागे टाकले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या माहितीनुसार, प्रभास आणि राणा डग्गुबत्ती स्टारर या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने अवघ्या दोन आठवड्यात तब्बल 390 कोटींची कमाई केली आहे. तर 'दंगल'चे भारतातील एकुण कलेक्शन 387 कोटी इतके होते. 
 
सर्व रिजनल भाषांमधील सिनेमाची नेट कमाई झाली 805 कोटी रुपये...
- ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांनी केलेल्या ट्विटनुसार, एस. एस. राजामौली दिग्दर्शित या सिनेमाने सर्व भाषांमध्ये भारतात नेट 805 कोटी रुपये कमावले आहेत. 
- तर सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन 1020 कोटी इतके आहे. ओवरसीजमध्ये या सिनेमाने  230 कोटींची कमाई केली. अर्थातच वर्ल्डवाइड या सिनेमाचे ग्रॉस कलेक्शन 1250 कोटी इतके झाले आहे.

हिंदीत नवीन क्लब स्थापन करणार 'बाहुबली 2'
- 'बाहुबली 2'चे हिंदी व्हर्जन बॉलिवूडमध्ये 400 कोटींचा नवा क्लब सुरु करणार असल्याचे दिसतंय.
- यापूर्वी आमिर खानच्या तीन सिनेमांनी भारतीय बॉक्स ऑफिसवर तीन क्बलची सुरुवात केली होती.  
- 2008 मध्ये आमिरच्या 'गजनी'ने 100 कोटी, '3 इडियट्स' (2009) ने 200 कोटी आणि 'पीके' (2014) ने 300 कोटी क्लबची सुरुवात केली होती. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, भारतीय बॉक्स ऑफिसवर हाईएस्ट ग्रॉस्टरच्या यादीतील इतर 8 सिनेमे कुठले आहेत..  
बातम्या आणखी आहेत...