आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

150Cr च्या बंगल्याचे मालक आहे धर्मेंद्र, गॅरेमध्ये ठेवली आहे 7 हजारांची रेंज रोव्हर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लुधियाना - बॉलिवूड स्टार धर्मेंद्र 8 डिसेंबरला त्यांचा 82 वा वाढदिवस साजरा करत आहे. लुधियानातील नसराली गावातील धर्मेंद्र आज स्वतःच्या टॅलेंटच्या जोरावर कोट्यधीश झाले आहेत. धर्मेंद्र खासदारही राहिले आहेत. त्यांनी दिलेल्या पॉलिटिकल अॅफिडेव्हिटनुसार धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी हेमा मालिनी जवळपास 150 कोटींच्या बंगल्याचे मालक आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये 20 वर्षे जुनी रेंज रोव्हर आहे, जिची किंमत 7 हजार रुपये आहे. 

 

10 वर्षांमध्ये 155 कोटींनी वाढली धर्मेंद्रंची संपत्ती 
- धर्मेंद्र यांनी बॉलिवूडमधील पारी अजून सुरुच आहे, त्यासोबतच त्यांनी राजकारणातही नशिब आजमावले होते. 2004 मध्ये ते राजस्थानमधील बिकानेर येथून भाजपचे खासदार होते. त्यांची पत्नी हेमा यांनी देखील 2004 मध्येच भाजपमध्ये प्रवेश केला होता. 
- 2004 मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, धर्मेंद्र यांनी 23 कोटींची संपत्ती घोषित केली होती. यामध्ये हेमा मालिनी यांच्या संपत्तीचाही समावेश होता. 
- 2014 मध्ये हेमा मालिनी उत्तर प्रदेशातील मथुरेतून लोकसभेच्या उमेदवार होत्या आणि विजयी झाल्या आहेत. त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांची संपत्ती 178 कोटींची आहे. धर्मेंद्र यांनी 2004 मध्ये घोषित केलेल्या संपत्तीपेक्षा हा आकडा 155 कोटी रुपयांनी जास्त होता. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुठे किती आहेत बंगले, हेमा यांची किती आहे संपत्ती... 

बातम्या आणखी आहेत...