आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय'चा सलमानच्या 'ट्यूबलाइट'वर प्रभाव?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या आगामी 'ट्यूबलाइट'चे या चित्रपटाचा टिझर नुकतेच प्रदर्शित झाला. रोजच्या कामात जरा ढिलेपणा असलेल्या एका तरुणाची ही कथा आहे. लडाख आणि मनालीच्या मनमोहक लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रित करण्यात आला असून तो हॉलिवूडच्या 'लिटिल बॉय'ने प्रेरित असल्याचे बोलले जात आहे. 

'लिटिल बॉय'मधील मुख्य कलाकार हा आठ वर्षांचा छोटा मुलगा आहे, तर ट्यूबलाइटचा हीरो हा 50 वर्षांचा तरुण आहे, एवढाच काय तो या दोन चित्रपटांमधील फरक आहे. 'लिटिल बॉय'मध्ये विश्वयुद्धाच्या वेळचे वातावरण आहे, तर 'ट्यूबलाइट'मध्ये भारत-चीन युद्धाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. लिटिल बॉयमधील मुलगा उंचीने बुटका असल्याने त्याचे सगळे मित्र त्याला चिडवतात. तो ते सगळे सहन करतो. मात्र, युद्धाच्या वेळी जेव्हा सैनिक असलेल्या त्याच्या वडिलांना बंदी बनवले जाते तेव्हा तो त्यांना सोडवून आणण्यासाठी प्राणाची बाजी लावतो. त्याच्याकडे एक अदृश्य शक्ती असते, त्या शक्तीच्या जोरावर तो ध्येय साध्य करतो. 
ट्यूबलाइटमध्येही सलमान आपला भाऊ सोहेलला (युद्धावर गेलेला) शत्रूच्या देशातून सुखरूप परत आणतो, असे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे सलमानकडेही अशीच एक अदृश्य शक्ती दाखवण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...