आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Birthday Special: First Time Shahrukh Khan St Columbas School Friends Disclose Unheard Facts On King Khan 52nd Birthday

B\'day SPL:एकेकाळी RSS शाखेत जायचा शाहरुख, लोक म्हणायचे बिग बींचा मुलगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: 38 वर्षांपूर्वी जेव्हा दिल्लीच्या विवेक थिएटरमध्ये शाहरुख खानने 'जोशीला' हा चित्रपट बघताना पहिल्यांदा गमतीजमती फिल्मी दुनियेचा बादशाह होणार असल्याचे म्हटले होते. तेव्हा गंमतीत म्हटलेले एकेदिवशी सत्यात उतरेल, याचा विचार कुणी स्वप्नातदेखील केला नसावा. त्यावेळी शाहरुख दिल्लीच्या सेंट कोलम्बस स्कूलमध्ये सातव्या वर्गात शिकत होता. त्यावेळी खरं तर शाहरुखला अभिनयात मुळीच रस नव्हता. KG पासून ते इंटरपर्यंत 13 वर्षे शाहरुख दिल्लीच्या याच शाळेत शिकला. येथेच त्याला गौरी भेटली. येथूनच त्याने बॉलिवूडचा किंग खान होण्याची स्वप्ने रंगवली होती.

फिल्म इंडस्ट्रीनंतर शाहरुखचा सर्वाधिक 13 वर्षांचा काळ येथेच गेला. त्यामुळे Divyamarathi.com आज तुम्हाला शाहरुखच्या 52 व्या वाढदिवसाचे औचित्य साधत बालपणीच्या शाहरुखची ओळख तुम्हाला करुन देत आहोत. आमच्या प्रतिनिधींनी किंग खानचे बालपणीचे मित्र विवेक खुशलानी, धीरज उपाध्याय आणि सिंगापूरमध्ये वास्तव्याला असलेले अशोक वसान यांच्याशी खास बातचित करुन शाहरुखच्या बालपणाविषयी जाणून घेतले. यापैकी दोन मित्र आजही शाहरुखच्या संपर्कात आहेत.  
 
वाचा Divyamarathi.com चा हा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट...

1st कहानी @जेव्हा 12 व्या वर्गात शाहरुख पहिल्यांदा गेला होता तुरुंगात..
- इंटरमध्ये शाहरुख आणि आम्ही (अशोक, विवेक, रमन शर्मा) नाइट आऊट करण्याचे ठरवले. आम्ही सर्वजण घरी खोटे बोलून दिल्ली एअरपोर्टजवळील जम्बो पॉईंटवर गेलो. जम्बो पॉईंटवर प्लेन लॅण्ड व्हायचे.
- रात्री 12-1 च्या सुमारास आम्ही एअरपोर्टच्या रनवेजवळ हॉकी खेळत होतो. तेव्हा तेथे पोलिसांची व्हॅन आणि आम्ही ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेण्यात आले. रात्रभर आम्ही पोलिस स्टेशनमध्येच होतो.
- नंतर शाहरुखच्या आईच्या सांगण्यावरुन आम्ही पोलिसांनी सोडले होते. आम्ही बाहेर पडल्यानंतर ऑटोने बसंत विहारच्या घरी गेलो.
- त्यावेळी शाहरुखची आई मजिस्ट्रेट होत्या. आम्ही भांडण, वादविवाद केल्यानंतर त्याच्या आईचे नाव सांगून पोलिसांपासून स्वतःचा बचाव करायचो. 

2nd कहानी @ शाळेत शाहरुखला लोक म्हणायचे 'अमिताभ का बच्चा'
- सेंट कोलम्बसमध्ये शिकत असताना शाहरुखने केस वाढवले होते. KG पासून ते 12th पर्यंतचे आमचे ग्रुप फोटो पाहिले असता शाहरुखला ओळखणे कठीण आहे. त्याचे वाढलेले केस तुम्हाला यात बघता येतील. वाढलेले केस ही त्याची ओळख होती. 
- त्याकाळत अमिताभ यांचा एक चित्रपट रिलीज झाला होता. त्यामध्ये त्यांनी केस वाढवले होते. शाहरुखच्या वाढलेल्या केसांमुळे आमच्या शिक्षिका डिसूजा शाहरुखला 'अमिताभ का बच्चा' म्हणू लागल्या होत्या. आमची गँगसुद्धा डिसूजा मिसला कावळा म्हणून चिडवायची.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, शालेय जीवनात कसा होता शाहरुख खान... RSSच्या शाखेत जायचा किंग खान...  
 
बातम्या आणखी आहेत...