मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन लॉस एंजिलिसमध्ये तिच्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या घटनेमुळे चर्चेत आले. या घटनेचा व्हिडिओ यूट्युबवर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिच्यावर घाणेरड्या कमेंट्स करणा-या व्यक्तीला ती खडे बोल सुनावताना दिसत आहे. शिवाय ती प्रचंड संतापलेली दिसत आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यादरम्यान अनेक चांगली माणसे भेटली. पण त्या व्यक्तीने सर्व मजा घालवली, असे रविनाने ट्विट करुन सांगितले.
रविना आता भारतात परतली आहे. ती मुंबईत तिचे पती अनिल थडानी आणि दोन मुलांसोबत मुंबईतील वांद्रास्थित एका आलिशान बंगल्यात वास्तव्याला आहेत. या बंगल्याचे नाव आहे 'नीलाया'. काही दिवसांपूर्वी divyamarathi.comला दिलेल्या एक्सक्लूझिव्ह मुलाखतीत रविनाने आपल्या बंगल्यातील इंटेरियरविषयी सांगितले.
रविनाने सांगितले, "केरळ येथील घरांप्रमाणे मला माझे घर सजवायचे होते. खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये क्वचितच हिरवळ बघायला मिळते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात वृक्ष बघायला मिळत नाही, शिवाय पक्ष्यांची किलकिलाट ऐकू येत नाही. मात्र माझ्या घरात तुम्ही पक्ष्यांची किलकिलाट सहज ऐकू शकतात. हाच अनुभव मला नेहमीपासून हवा होता. सकाळी उठल्यानंतर खिडकीतून हिरवळ आणि फुल बघण्याचे माझे स्वप्न होते. तसे घर आज माझ्याजवळ आहे."
divyamarathi.com तुम्हाला रविना टंडन हिच्या ड्रीम होमची खास झलक दाखवत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा रविना टंडनचे ड्रीम होम आहे तरी कसे...
सर्व फोटोः अजीत रेडेकर