आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inspiring Dialogues Of Akshay Kumar Starer Airlift Hindi Movie

\'AIRLIFT\' मध्ये असे आहेत अक्षय कुमारचे लक्ष वेधणारे दमदार डायलॉग्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा ‘एअरलिफ्ट’ हा सिनेमा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. हा सिनेमा १९९०-९१मध्ये इराक-कुवैतमध्ये झालेल्या युद्धादरम्यान तेथे अडकलेल्या भारतीयांवर आधारित आहे. अक्षय कुमारने या सिनेमात रणजित कट्याल नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले आहे. तो एक भारतीय आहे, परंतु तो कुवैतमध्ये वास्तव्यास असतो. मात्र १९९०-९१मध्ये इराक-कुवैतमध्ये झालेल्या युद्धादरम्यान परिस्थिती बदलते आणि इतर नागरिकांप्रमाणेच रणजित कट्याल म्हणजेच अक्षय कुमारला तेथील प्रसंगांना सामोरे जावे लागते.

इराक-कुवैतमध्ये झालेल्या युद्धात तेथे अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्याच्या मिशनसंदर्भात या सिनेमात दाखविण्यात आले आहे. तो कुवैतमध्ये अडकलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना सुरक्षित कसे ठेवता येईल याचे प्रयत्न सुरु करतो. या सिनेमाचे दिग्दर्शन राजा कृष्णा मेनन यांनी केले आहे. अक्षय कुमारसोबत सिनेमात अभिनेत्री निमरत कौर सुद्धा आहे. या सिनेमातील अक्षयच्या तोंडी असलेले संवाद लक्ष वेधून घेणारे आहेत.
सिनेमातील खास डायलॉग्सचा नजराणा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वाचा अक्षयचे दमदार संवाद...