Home »News» Interesting Facts About Bollywood Celebrity Weddings

80 kg केक ते बीएमडब्ल्यु गिफ्ट, असे आहेत या सेलिब्रेटींच्या लग्नाचे किस्से

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 10:58 AM IST

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लग्न सर्वांसाठीच कुतुहलाचा विषय असतो. सेलिब्रेटी असल्यामुळे ते लग्नही हटके पद्धतीने करणार असे आपणास वाटते आणि काही बाबतीत ते खरेही आहे. आज सुनील शेट्टी त्याचा 56 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. सुनील शेट्टीच्या लग्नाबाबत एक रंजक किस्सा आहे. सुनीलने 1991 साली माना कादरीसोबत लग्न केले होते. लग्नात सुनीलने मानाला बीएमडबल्यु कार गिफ्ट केली होती. या कारमागे त्याने बीएमडब्ल्यूला डिस्क्राइब करुन लिहीले होते, 'BMW- Be My Wife'. तर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कापला होता 80 किलोचा केक..

राज आणि शिल्पा यांचे लग्न 2009 साली झाले. लग्नामध्ये शिल्पाने 5 लाख रुपयांचा लहंगा आणि 3 कोटींचे दागिने घातले होते. यांच्या लग्नाबाबत असा किस्सा आहे की, लग्नामध्ये शिल्पाने 80 किलोचा 9 स्टेजचा केक कापला होता.

पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर सेलेब्सच्या लग्नातील काही खास आठवणी..

Next Article

Recommended