आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी 11 वर्षे मोठ्या मुलीला फ्लाइंग किस देत होता SRK, असे आहेत शाहरुखचे किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान - Divya Marathi
शाहरुख खान
मुंबई - 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा 52वा वाढदिवस आहे. शाहरुखने दिल्लीत थिएटरपासून अॅक्टिंग करिअर सुरु केले होते. त्यानंतर टीव्ही शो 'फौजी' मध्ये अभिमन्यु ची भूमिका त्याने केली. 'दिवाना' फिल्ममधून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. शाहरुखला त्याच्या आतापर्यंतच्या फिल्मी करिअरमध्ये 8 फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले आहेत. विशेष म्हणजे शाहरुख शिवाय बेस्ट अॅक्टर्सचे 8 फिल्मफेअर अवॉर्ड फक्त दिलीपकुमार यांना मिळाले आहेत. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com सांगत आहे, त्याच्याबद्दलचे खास किस्से...
 
जेव्हा 5 वर्षांचा शाहरुख 16 वर्षांच्या मुलीला देत होता फ्लाइंग किस 
- शाहरुखचे बालपण दिल्लीत गेले. लहानपणी तो फार खोडकर असल्याचे त्याला ओळखणारे सांगतात. एकदा 16 वर्षांची मुलगी शाहरुखच्या घरी आली आणि त्याच्या वडिलांकडे तिने शाहरुखची तक्रार केली. मुलगी म्हणाली, 'तुमचा मुलगा भिंतीवर बसून मला फ्लाइंग किस देतो आणि स्विटहार्ट म्हणत असतो.' शाहरुखच्या वडिलांचा मुलीच्या तक्रारीवर विश्वासच बसला नाही. ते म्हणाले, 'असे होऊच शकत नाही. तो माझा मुलगा नसेल. तुम्ही चुकीच्या घरात आल्या. माझा मुलगा फक्त पाच वर्षांचा आहे. वाचल्यास मी त्याला आता बोलावतो. तो इथेच असेल. तुमची छेड काढणारा दुसरा कोणी असेल.' त्यानंतर शाहरुखच्या वडिलांनी त्याला बोलावले, तेव्हा रुममध्ये आल्यानंतर त्याने मुलीला पाहिले आणि तिला फ्लाइंग किस ते म्हटला - हाय स्विटहार्ट!'
 
पुढील स्लाइडमध्ये, तुम्ही याआधी वाचले नसतील शाहरुखचे हे किस्से... 
बातम्या आणखी आहेत...