आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडनमध्ये शिकली आहे जॉनी लिव्हरची मुलगी, हिरोइन नव्हे कॉमेडियन बनून कमावतेय नाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील जॉनी लिव्हरबरोबर जॅमी. - Divya Marathi
वडील जॉनी लिव्हरबरोबर जॅमी.
मुंबई - बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडीयन जॉनी लिव्हर यांची मुलगी जॅमी सध्या टिव्ही शो 'सबसे बडा कलाकार'मध्ये तिच्या कॉमिक स्टाइलने सर्वांना हसवत आहे. 10 सप्टेंबर 1980 ला मुंबईत जन्मलेल्या जॅमीचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पण नंतर तिने लंडनमधून उच्चशिक्षण घेतले. वेस्टमिन्स्टर युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग कम्युनिकशेनची मास्टर डीग्री तिने मिळवली. जॉनी लिव्हर सध्या फारसे कॉमेडी करताना दिसत नाही. मात्र त्यांची कमतरता त्यांची मुलगी भरून काढत आहे. 

वडिलांची इच्छा होती, कॉमेडी नव्हे जॉब करावा 
एका मुलाखतीत जॅमीने सांगितले की, ती वडिलांना फार घाबरायची. ते घरी आले की वातावरण अगदी शांत व्हायचे. मी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे अशी त्यांची इच्छा होती. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मला शिकण्यासाठी लंडनला पाठवले. त्याठिकाणी मास्टर डिग्री मिळवल्यानंतर मी तिथेच एका मार्केट रिसर्च एजन्सी 'विजनगेन' मध्ये मार्केटींग एक्झिक्युटिव्ह म्हणून जॉबही केला. 

पुढील स्लाइड्सवर, अनेकदा एकटी बसून रडायची जॅमी लिव्हर...
 
बातम्या आणखी आहेत...