आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी म्हणाले, विनोद-शत्रुघ्न मोठे स्टार, घरची डिसिजन मेकर आहे मुलगी श्वेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन)
मुंबईः 'पीकू' या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर आता बिग बी आपल्या आणखी एका नवीन सिनेमासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव आहे 'वजीर'. यानिमित्ताने divyamarathi.comने त्यांच्याशी खास बातचित केली. या मुलाखतीत बिग बींनी त्यांचे खासगी आयुष्य, स्पर्धा आणि फिल्मी करिअरविषयीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.
शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना यांना कमी महत्त्व मिळाले...
बिग बींनी कबुल केले, की फिल्म इंडस्ट्रीत त्यांना खूप महत्त्व प्राप्त झाले. मात्र ते स्वतःला मोठे स्टार समजत नाहीत. त्यांच्या मते, शत्रुघ्न सिन्हा आणि विनोद खन्ना हे स्टार्स प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झाले. व्हिलनची भूमिका असो वा हीरोची, त्यांनी ती उत्कृष्टरित्या निभावली. सिनेमांसोबतच राजकारणातसुद्धा ते यशस्वी ठरले. मात्र त्यांना इंडस्ट्रीत जे स्थान मिळायला हवे होते, ते मिळाले नाही. तर बिग बी अनेक क्षेत्रात अपयशी ठरले, शिवाय ते राजकारणातही यश मिळवू शकले नाहीत.
घरची डिसिजन मेकर आहे श्वेता...
बिग बींनी सांगितले, की त्यांची मुलगी श्वेता युनिव्हर्सल अॅडव्हाइजर आहे. जेव्हा कधी घरात एखाद्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घ्यायची वेळ येते, तेव्हा आम्ही तिच्याशी संपर्क साधत असतो.
अमिताभ यांना सतावते भीती...
अनेक हिट सिनेमे देणारे बॉलिवूडचे महानायक यांना सतत ही भीती वाटत असते, की येणा-या काळात त्यांना सिनेमे मिळणार की नाहीत. बॉलिवूडमध्ये आता अनेक चांगले अभिनेते कार्यरत आहे. सोबतच नवी पिढी उत्तम काम करत आहे. या सर्वांचे काम बघून बिग बी खुश होतात. मात्र भविष्यात सिनेमांच्या ऑफर्स मिळणे बंद तर होणार नाही ना, ही भीतीसुद्धा त्यांना सतावत असते.
पुढे वाचा, उर्वरित मुलाखत...
फोटोः अजीत रेडेकर