आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पायलटची नोकरी सोडून हा तरुण वळला अभिनयाकडे, मुग्धा गोडसे आहे सख्ख्या भावाची गर्लफ्रेंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता मुकूल देव, इनसेटमध्ये मुकुलचा सख्खा भाऊ राहुल देव आणि त्याची गर्लफ्रेंड मुग्धा गोडसे - Divya Marathi
अभिनेता मुकूल देव, इनसेटमध्ये मुकुलचा सख्खा भाऊ राहुल देव आणि त्याची गर्लफ्रेंड मुग्धा गोडसे
चंदीगडः 'सन ऑफ सरदार', 'आर राजकुमार', 'जय हो', 'भाग जॉनी', 'यमला पगला दीवाना' या सिनेमांमध्ये झळकलेला अभिनेता मुकूल देव बालपणी इतर मुलांप्रमाणेच खूप खोडकर होता. बालपणी केलेला एक खोडकरपणा मुकूल कधीही विसरु शकत नसल्याचे त्याने भास्करसोबत बातचित करताना सांगितले. बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना मुकूलने सांगितले, की त्याचा एक शालेय मित्र रजत कुंग फू शिकायचा. त्याच्याकडे नाइफ स्काउट (चाकू) होता. मी त्याच्याकडून तो चाकू हिसकावून घेतला आणि एका हुशार विद्यार्थ्याला परीक्षेत पेपर दाखवला नाही, तर मग तुझी खैर नाही, अशी धमकी दिली. ही गोष्ट प्राध्यापकांपर्यंत पोहोचली. त्यांनी मला खूप मारले. घरी आल्यानंतर वडिलांनीही चार वेळा थोबाडीत मारले.

अभिनेता मुकूल देवला बालपणी सिनेमे लार्जर दॅन लाईफ वाटायचे. शोले, कर्ज हे सिनेमे बघून अभिनेता होण्याचे त्याने ठरवले. ऋषी कूपर स्टारर कर्ज सिनेमा बघून थिएटरबाहेर पडल्यानंतर तो खूप नाचला होता. त्यावेळी मुकूल पाचव्या वर्गात होता. बालपणी मुकूल नसीरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांची मिमिक्री करायचा.
चार वर्षे पायलटची नोकरी केल्यानंतर वळला अभिनयाकडे
मुकूलने सांगितले, "मी पोलिसांत जावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. माझे वडील पोलिस ऑफिसर होते. मात्र वडिलांचे हेटिक रुटीन आईला ठाऊक असल्याने मी त्या क्षेत्रात जाऊ नये, अशी तिची इच्छा होती. त्यामुळे मी पायलटचे ट्रेनिंग घेतले. तीन-चार वर्षे पायलटची नोकरी केल्यानंतर अभिनयातील आवडीमुळे मी अभिनय क्षेत्राकडे वळलो. आत्तापर्यंतच्या सिनेसृष्टीतील प्रवासाविषयी मी समाधानी आहे."
अभिनेता राहुल देव आहे सख्खा भाऊ...
अभिनेता राहुल देव हा मुकुलचा सख्खा भाऊ आहे. बॉलिवूडमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी राहुल प्रसिद्ध असून गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मॉडेल मुग्धा गोडसेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. आता हे दोघे लिव्ह-इन पार्टनर्स बनले आहेत. हे कपल अंधेरी स्थित एका बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले आहेत. 47 वर्षीय मॉडेल आणि अभिनेता राहुल देवने 1998 मध्ये रीना देवसोबत लग्न केले होते. 2009 मध्ये कॅन्सरने रीनाचे निधन झाले. राहुलला अर्णव हा एक मुलगा आहे. मुग्धा आणि राहुलची लव्ह लाइफ अनेक दिवसांपासून चर्चेत होती. दोघांची भेट एका फॅशन शोमध्ये झाली होती. येथूनच त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
हॉबीः वाचन करणे, संगीत ऐकणे. माझ्या लायब्ररीत विविध विषयांवरची पुस्तके आहेत. यामध्ये बेस्ट सेलर्स, बायोग्राफी, स्प्रिचुअल पुस्तकांचा समावेश आहे. मला प्रत्येक प्रकारचे संगीत ऐकायला आवडते.

ड्रीम रोलः मला सायको व्यक्तिरेखा साकारायची आहे. अशा भूमिकांमध्ये स्वतःची क्रिएटीव्हीटी दाखवण्याची संधी असते.

ब्रॅण्डः माझ्याकडे जास्त ब्रॅण्डेड वस्तू नाहीत. एखाद्या ब्रॅण्डविषयी मी पर्टिकुलर नाही. जे आवडतं, ते मी विकत घेतो.

आवडते पदार्थः इंडियन आणि पंजाबी फूड. राजमा चावल मला जास्त आवडतं.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, मुकूल देवची खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...