आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Interview : चित्रपटात अभिनय करायचे नसल्याने वाटले हायसे, सचिनने शेअर केल्या अशाच अनेक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सचिन: अ बिलियन ड्रीम्स केवळ एक चित्रपट नाही तर क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरची जीवनयात्रा आहे. कमी बोलणारा आणि लाजाळू असा सचिन तेंडूलकर अशा सचिनने त्याच्या जीवनातील अनेक किस्से एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहेत. वाचा, सचिन तेंडूलकर बरोबरची ही खास मुलाखत..

क्रिकेट करिअरमध्ये नेहमी फिल्डवर शांत राहणे तुला कसे काय जमले?
मी लहानपणी माझ्या वडिलांच्या स्वभावाचे नीट निरीक्षण करायचो. ते नेहमीच शांत राहायचे. घरामध्ये चाललेल्या अनेक गोष्टींवरुन ते कधीच चिडले नाही. एवढेच नव्हे तर माझे चुलत भाऊ बहीणही सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे येत असत. सर्वाना त्यांच्या प्रत्येक निर्णयावर फार विश्वास होता. मी नेहमीच त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत तसेच करत राहणार. मी माझ्या आईवडिलांकडून खूप काही शिकलो आहे.
 
नकारात्मक विचार आल्यावर त्यांना कसे सोडविण्याचा प्रयत्न करतोस? 
तुमच्यासोबत जर योग्य लोक असतील तर नकारात्मक विचारच तुमच्यापासून दूर पळू लागतात. मी एकटा जरी ग्राउंडवर खेळण्यास जात असेल तरी माझ्यावर एक मोठी टीमही मेहनत घेत होती. ती टीम आहे माझी फॅमिली. माझी फॅमिली माझी सर्वात मोठी ताकद आहे. माझे सहकारी, कोच, मित्र हे नेहमीच माझ्यासोबत होते. मी स्वतःला नशीबवान समजतो की माझ्याजवळ इतके चांगले लोक आहेत.

तुझे मित्र तुझ्याकडे चांगली विनोदबुद्धी असल्याचे सांगतात पण तु स्वतः फार कमी हसताना दिसतोस..?
या चित्रपटात जेव्हाही मी मनमोकळे हसलो, रडलो असे सर्वच क्षण आहेत. हो हे खरे आहे की मला खुलायला थोडा वेळ लागतो. माझ्या मित्रांसोबत मी वेगळा असतो ज्यामुळे इतर लोक माझा स्वभाव समजू शकत नाही. 
 
चित्रपटात येण्यासाठी फार वेळ घेतलास? 
चित्रपटाच्या सुरुवातीला मला वाटले होते की मी सर्व गोष्टी शेअर करु शकेल की नाही. चित्रपटाबाबत ऐकल्यावर माझा पहिला प्रश्न हाच होता की मला चित्रपटात अॅक्टींग करावी लागेल का? जेव्हा त्यांनी सांगितले, की ते केवळ फुटेज वापरणार आहेत त्यावेळी मला हायसे वाटले. 
 
पुढच्या 7 स्लाईडमध्ये वाचा, मुलाखतीचा बाकीचा भाग..
बातम्या आणखी आहेत...