आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW : सलमान म्हणाला, \'बजरंगी भाईजान\'मध्ये वादग्रस्त काहीच नाहीये\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या 'बजरंगी भाईजान' सिनेमामुळे चर्चेत आहे. काही सांप्रादायिक लोकांकडून सिनेमाचा विरोध होत आहे तर कुठे चाहते सिनेमाविषयी खूप उत्साही आहेत. सिनेमाविषयी स्वत: सलमान काय-काय म्हणतो जाणून घेऊया त्याच्या तोंडून...
तुम्ही सिनेमाचे शिर्षक 'बजरंगी भाईजान' ठेवले आहे. असे वादग्रस्त नाव ठेवण्यामागे काही खास कारण?
- मला नाही वाटत सिनेमाचे नाव वादग्रस्त आहे. याच्या नावाच्या आधारे आम्ही हिंदू-मुस्लिम बंधुत्व दर्शवले आहे. सर्व धर्मांपेक्षा मोठा धर्म असतो, तो म्हणजे मानवता. 'बजरंगी भाईजान' शिर्षकाचे हिंदू-मुस्लिम वादाशी काही एक घेण देण नाहीये.
ऐकिवात आहे, की व्हॉट्सअॅपवर तुझ्या विरोधात अपप्रचार करणा-यांच्या विरोधात तू तक्रार दाखल केली आहे?
- हो, काही लोक असतात, जे धर्माच्या नावाखाली दुस-यांना नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. असेच काहीसे माझ्यासोबतसुध्दा घडले आहे. काही लोकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून 'बजरंगी भाईजान'चा चुकीचा प्रतार केला जात होता, ते अजिबात योग्य नव्हते. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी मी तक्रार दाखल केली.
'बजरंगी भाईजान', नाव हिंदु-मुस्लिम नात्यावर आधारित असल्यासारखे वाटते?
- नाही, असे अजिबात नाहीये. जसे मराठीत गुराजतींना रमेश भाई, सुरेश भाई असे म्हटले जाते. पंजाबीमध्ये प्राजी म्हणतात. असे 'बजरंगी भाईजान' म्हणण्याची टोन आहे बाकी काही नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सिनेमाविषयी सलमानने कोण-कोणत्या गोष्टी शेअर केल्या...