आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान आत्महत्या प्रकरणावर बोलला सूरज पंचोली, \'ती आजसुध्दा मला वाचवतेय\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सूरज पांचोली आणि जिया खान)
मुंबई- डेब्यू 'हीरो' सिनेमापूर्वी गर्लफ्रेंड जिया खानची आत्महत्या प्रकरणात अडकलेल्या सूरज पांचोलीने आमच्यासोबत याविषयावर बातचीत केली. त्याचा सिनेमा ११ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. त्याने सलमानच्या सपोर्ट आणि वडील आदित्यच्या रागीट स्वभावावरसुध्दा टिका केली. सलोनी अरोराने त्याच्याशी केलेल्या बातचीतचे काही अंश...
तुझ्यासाठी सलमान खान काय आहे?
सलमान मेंटरपेक्षा जास्त माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पाठिंबा आहे. माझी आई सांगते आणि मीसुध्दा मानतो, की सलमान माझ्यासाठी एंजेल आहे. मी त्याच्यावर नेहमी प्रेम करेल. प्रयत्न करेल, की त्याच्या आशिर्वाद नेहमी माझ्यासोबत राहिल. त्याने मला संधी दिली नसती, तर आजसुध्दा मी संघर्षच करत राहिलो असतो. लोक म्हणतात, फिल्मी बॅकग्राऊंडमुळे आम्हाला लवकर काम मिळते. परंतु असे नाहीये. मी स्वत: या सिनेमासाठी सलमानकडे गेलो.
जिया खानच्या आत्महत्येनंतर तिच्यावर केलेल्या प्रेमाला दु:ख मानतो?
मी पूर्ण आयुष्यभर तिच्यावर प्रेम करेल. मी तिचा नेहमी आदर केला आणि करत राहिल. मी तिच्यासाठी रोज पूजा करतो. तिला सर्व सत्य माहित होते. मी कोणतीच चुकी केली नाहीये, म्हणून आजसुध्दा ती मला वाचवत आहे.
जिया खान (आत्महत्या) प्रकरणानंतर तुझी प्रतिमा नकारात्मक झाली...
जे लोक मला नाही ओळखत ते मला वाईटच समजणार. परंतु सलमान खान मला जवळून ओळखतो, म्हणून त्याला माहित आहे, की कसा आहे. मी कुणालाच दोष देत नाही. मला चुकीचे दर्शवले गेले, परंतु सत्य माहित असणारेसुध्दा माझ्यासोबत उभे आहेत. एकेदिवशी सत्य लोकांसमोर नक्की येईल. काहीप्रमाणेत आलेदेखील आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सूरज आणखी कोण-कोणत्या विषयांवर बोलला...