आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview: Ravish Kapoor, Who Designed Shahid Kapoor’S Wedding Card!

जाणून घ्या, कुणी तयार केले शाहिदच्या लग्नाचे कार्ड, चहा-मध का ठेवण्यात आले सोबत?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूरच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका, इनसेटमध्ये रविश कुमार)
मुंबई- रविश कुमार एका दशकापासून निमंत्रण पत्रिका प्रिटींगचा बिझनेस करत आहेत. परंतु 2009मध्ये त्यांनी शिल्पा शेट्टीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका छापल्यानंतर रविश लाइमलाइटमध्ये आले होते. 6 वर्षानंतर रविश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूर आणि दिल्लीची तरुणी मीरा राजपूत यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकासुध्दा रविश यांनीच डिझाइन केली आहे. divyamarathi.comसोबत खास बातचीतदरम्यान रविशा यांनी सांगितले, की हृतिक रोशन, करिश्मा कपूरसह अनेक बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका बनवण्याच्या त्यांना ऑफर मिळाल्या होत्या. या बातचीतमध्ये त्यांनी शाहिदच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचा आतील भागांवरही प्रकाश टाकला...जाणून घेऊया रविश कुमार यांनी डिझाइन केलेल्या शाहिदच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेविषयी...
शाहिदने कोणत्या प्रकारच्या कार्डची डिमांड केली होती?
- शाहिद आपल्या लग्नाचे कार्ड क्रिम आणि फिरोजी रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये हवे होते. सोबतच गोल्डन रंगाचे कमीत-कमी वापर करण्यास सांगितले. त्याला सुंदर आणि सोज्वळ निमंत्रण पत्रिका हवी होती.
कार्डमध्ये मध आणि चहा ठेवण्याची कल्पना कशी सुचली?
- शाहिदचे कुटुंबीयांनी इच्छा होती, की कार्डसोबत पाहूण्यांना काहीतरी गोड पदार्थ भेटावा. म्हणून नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे म्हणून त्यांनी कार्डसोबत चहा आणि मध ठेवले. (शाहिदच्या कार्डसोबत मधाच्या चार बॉटल्स आणि चहाचे दोन बॉक्ससुध्दा ठेवण्यात आले होते.) चहा दिल्लीच्या टी-स्टोअर आनंदिनी हिमालया टीमधून तयार करण्यात आला आहे. हा यूनिक ब्लेंडसाठी ओळखला जातो.
तुम्ही कार्ड तयार (डिझाइन) करत असताना यात शाहिदचा किती सामावेश होता?
- खूप जास्त. सुरुवातीला त्याचे आई-वडील आहेत आणि कार्डची कल्पना दिली. १५ दिवसांनंतर कार्डचे प्रेझेंटेशन दिले तेव्हा शाहिदसुध्दा उपस्थित होता. त्याने कार्डला निरखून पाहिले. मीरा आणि त्याचे नाव लिहण्यासाठी फॉन्ट सांगितला.
कपूर कुटुंबीय धार्मिक आहेत. त्यांनी कार्डमध्ये देवाचा उल्लेख केला आहे?
- कार्डमध्ये देवासंबंधित काहीच नाहीये. कपूर कुटुंबीयांचे म्हणणे आहे, की लोक लग्नानंतर कार्ड फेकून देतात. त्यांना धार्मिक भावनांना अपमान करायचा नाहीये. म्हणून त्यांनी देवाच्या नावाचा उल्लेख कार्डमध्ये केलेला नाहीये.
किती निमंत्रण पत्रिका छापल्या?
लग्न आणि रिसेप्शन मिळून एकूण 500 कार्ड प्रिंट केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाहिदच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची एक झलक...