आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Interview With Pakistani Actress Mehwish Hayat. Read More Bollywood News

पाकिस्तानची पहिली ITEM GIRL,व्हिडिओ अपलोड होताच झाला VIRAL

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
mehwish hayat - Divya Marathi
mehwish hayat
चंडीगड- पाकिस्तानी अभिनेत्री महविश हयात सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'जिंदगी' चॅनलवरील ‘कभी कभी’सीरियलमध्ये महविश झळकली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी सिनेमातील पहिले आयटम सॉंग हे महविश हयातवर चि‍त्रित करण्यात आले होते. 'ना मालूम अफराद' या सिनेमातील आयटम सॉंगमध्ये महविश थिरकली आहे. महविशच्या या आयटम सॉंगचा व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होताच तो व्हायरल झाला आहे.

'कभी कभी' सिरियलमध्ये झळकलेल्या महविशशी आमची सहयोगी वेबसाइट bhaskar.comने बातचीत केली. भारतीय प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले आहे. भारतीयांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी थक्क झाले आहे. माझे नातेवाइक, मित्र इतकेच नव्हे तर पाकिस्तानी टीव्ही इंडस्ट्रीने आश्चर्य व्यक्त केले असल्याचे महविशने म्हटले आहे. पाकिस्तानी सीरियलमध्ये भारतीयांना काय आवडले की, त्याच्याकडून इतकी वाह वाह मिळत आहे? हा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे.
दुसरीकडे, इतका मोठा प्रेक्षकवर्ग मिळाल्याने पाकिस्तानी सीरियल्समध्ये काम करणार्‍या कलाकारांचेही भाव वधारले आहेत. परिणामी आता भारतीय प्रेक्षकांची आवड लक्षात घेवून सीरियल्सचे प्लानिंग केले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्याला भारतीय सिनेमा आणि सिरिरयल्सच्या ऑफर्स मिळत असल्याचे महविशने सांगितले. परंतु, महविशला अद्याप चांगल्या सिनेमाच्या प्रतिक्षा आहे.
महविशविषयी...
> महविश आणि पाकिस्तानी अॅक्टर एहसान खान ही जोडी टेलीव्हिजनवर जबरदस्त हिट ठरली आहे. 'मेरे कातिल मेरे दिलदार', 'कभी कभी', 'आईना दुल्हन का'मध्ये दोघांची प्रमुख भूमिका साकारली आहे.
> महविशची बहिण अफसीन ही सिंगर आहे. तिने आपले पहिले सॉंग महविशवर चित्रित केले आहे.
> डान्स इन्स्टिट्यूट नसल्यामुळे महविशला डान्स शिकता आला नाही. पाकिस्तानात एखादे डान्स स्कूल सुरु करण्याची महविशची मनिषा आहे.
> महविश स्वत:ला 'सेल्फी क्वीन' संबोधते. कारण तिला सेल्फी घेऊन 'इंस्टाग्राम'वर पोस्ट करणे आवडते.
'बिल्ली' म्हणून हाक मारतात चाहते...
पाकिस्तानातील हिट सिनेमा ‘ना मालूम अफराद’मध्ये आपल्या आयटम नंबर ‘बिल्ली’मुळे महविश प्रसिद्धीच्या झोतात आली होती. महविशला चाहते प्रेमाने 'बिल्ली' हाक मारतात.


'जिंदगी'ने मिळवून दिली नवी ओळख...
पाकिस्तानी सीरियल प्रसारित करणारे 'झी नेटवर्क'चे चॅनल 'जिंदगी'ने पाकिस्तानी कलाकारांनी भारतात एक नवी ओळख करून दिली आहे. फवाद खान आणि माहिरासारख्या कलाकारांनी तर भारतीय सिनेमात एंट्री केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, महविश हयातच्या दिलखेचक अदा...