आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-वडिलांची स्वप्ने आवाक्याबाहेरची, हे समजावण्याची गरज; कैलाश खेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलीवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर शनिवारी भोपाळमध्ये होते. मुलांमध्ये वाढते नैराश्य पाहून विविध विषयांवर त्यांनी ‘भास्कर’शी संवाद साधला. आई-वडिलांची स्वप्ने खूप आवाक्याबाहेेरची असतात. यामुळे मुलांना नव्हे तर पालकांनाच कुणीतरी हे समजावून सांगण्याची खरी गरज आहे. यावर त्यांनी मांडलेली मते त्यांच्याच शब्दांत...  

जेव्हा आत्महत्येसाठी  मी गंगेत उडी मारली...  
१९९८ चा प्रसंग. चहुबाजूंनी नैराश्य आलेल्या अवस्थेत मी ऋषिकेशला होतो. वडील पुरोहित होते. तेच काम सुरू करावे म्हणून मी परमार्थ निकेतनला पोहोचलो. मला नैराश्य आलेले होते. आता जगायचे नाही, असे ठरवून गंगेत उडी मारली. माझे एक ज्येष्ठ सहकारी होते-श्यामभाई. त्यांनी लगेच गंगेत उडी घेऊन माझा जीव वाचवला. तेथेही अपयश आल्याचे पाहून वाटले, मला मरताही आले नाही! त्यानंतर स्वामी पूर्णानंद यांची भेट झाली. 

त्यांनी सांगितले - मरण मोठी भक्तिसाधना आहे. समाधी आहे. ते वाईट नाही. त्यांच्या उत्तराने मला धक्का बसला. ते म्हणाले , “ तू शरीराने मरणार अाहेस की काही अवयव सोबत घेऊन मरणार आहेस.’ त्यांचे बाेलणे मला समजले नाही. ते म्हणाले , “ तुला स्वत:साठी काही नको. मग असे समजून चाल की तू जिवंत नाहीस. तुझी आत्महत्या झालेली आहे. स्वत: तर मेला आहेसच.’  

मग तेव्हापासून जीवनात कुणापासून काही नको हीच माझी इच्छा आहे. येथूनच माझा नवा प्रवास सुरू झाला. तेव्हा जे गाणे गायले त्यावरून सर्वांचा लाडका झालो.  

जीवनात निराश झालेल्या मुलांना काय सांगाल?
मुलांपासून सर्वाधिक अपेक्षा आई-वडिलांना आहेत. त्यांना स्वत:ला काही जमले नाही; पण मुलांकडून मात्र खूप अपेक्षा ठेवतात. त्यांनी आपली  चिंता मुलांवर लादली आहे. एपीजे अब्दुल कलाम यांनी म्हटले : देश वाचवायचा असेल तर मुलांवर विश्वास ठेवा. त्यानुसार विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी.

अनुपम खेर नेहमी म्हणतात : काश्मीरमधून एक जात हद्दपार करण्यात आली. तुम्हीसुद्धा काश्मीरचे आहात? काय सांगाल?  
माझा यावर विश्वास नाही. मी संपूर्ण देशाचा आहे. राजकारणातून जमिनीचा वाद उभा राहिला. मी अंत:करणापासून विचार करतो. मौन बाळगण्यापेक्षा स्पष्टवक्तेपणा कधीही चांगला. काश्मीरमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा जवानांनी सर्वांचे प्राण वाचवले. सगळ्यांना त्यांनी अन्नपुरवठा केला. पीओकेचा कोण  आणि इथला कोण असा भेदभाव केला नाही. तेव्हा माणुसकीच महत्त्वाची ठरली.
बातम्या आणखी आहेत...