आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत 12 जुलै रोजी होणारेय शाहिदचे रिसेप्शन, समोर आले इन्व्हिटेशन कार्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(शाहिद कपूरच्या रिसेप्शनचे इन्व्हिटेशन कार्ड, इनसेटमध्ये शाहिद आणि मीरा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचे 12 जुलै रोजी मुंबईत वेडिंग रिसेप्शन पार पडणारेय. यासाठी रॉयल इन्व्हिटेशन कार्ड छापण्यात आले आहेत. हे कार्ड रवीश कपूर यांनी डिझाइन केले असून, त्यांनीच शाहिदच्या लग्नाचे कार्डसुद्धा तयार केले होते. ब्लू कलरचे हे कार्ड सुपर एलिगेंट आहे. यामध्ये क्रोम प्लेटेड रिमुव्हेबल इन्व्हिटेशन असून पाहुण्यांना रिसेप्शनस्थळी ते सोबत न्यावे लागणार आहे.
लग्नाच्या पत्रिकेत 'नो गिफ्ट प्लीज, ब्लेसिंग ऑनली' असे नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे या रिसेप्शन कार्डमध्येही याचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. शाहिदचे 7 जुलै रोजी दिल्ली बेस्ड मीरा राजपूतसोबत लग्न झाले आहे. मीराच्या कुटुंबीयांनी याचदिवशी गुडगांव येथील हॉटेल ओबरॉय येथे रिसेप्शन दिले होते. आता 12 जुलैला शाहिदच्या कुटुंबीयांनी मुंबईतील हॉटेल पॅलेडियम येथे रिसेप्शन आयोजित केले आहे.
पुढे पाहा, या कार्डची आणखी एक झलक...