आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्न वेबसाइट्स बॅन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला इरफानचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच, सरकारने अनेक पोर्न वेबसाइट्सवर बंदी आणली आहे. त्यातील काही साइट्स वगळता इतर साइट्सवरील बॅन काढण्याचा आदेशही देण्यात आला आहे. या मतावर अभिनेता इरफान खान सहमत नाहीये.
तो म्हणाला, 'इंटरनेटवरील कोणत्याही प्रकारची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे ही खूप चांगली गोष्ट आहे. मात्र त्या आई-वडिलांना चिंता आहे, की आपली मुले आरामात अॅडल्ड कंटेट पाहू शकतात. इंटरनेटवर या घाणेरड्या कंटेटवर कुणाचीच बंद नाहीये.'
इरफानचे दोन किशोरवयीन मुले आहेत आणि त्याला चिंता आहे, की पोर्नोग्राफी मुलांसोबत काय करू शकते.
त्यांच्या सांगण्यानुसार, 'ही केवळ चाइल्ड पोर्नोग्राफीची गोष्ट नाहीये, हा एक गंभीरविषयी आहे. एका पाच वर्षांचा मुलगा पोर्नोग्राफी सहज पाहू शकतो, त्याला माहितदेखील नसते की ते काय आहे? पोर्नोग्राफी प्रेमाला शारीरिक आणि मूळ रुपात जाऊन थांबवते.'