आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलीवूडचा 'आयर्न मॅन' पुण्यात दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- जबरदस्त अशा 'अल्ट्रॉन' या खलनायकाशी धडाकेबाज, डॅशिंग फाईट करणाऱ्या आयर्न मॅनसोबत फोटो काढण्यासाठी पुण्याच्या इनऑर्बिट मॉलमध्ये रसिकांनी आज गर्दी केली आज शनिवार (दि. 4) आणि रविवारी (दि. 5) पुण्यातील इनऑर्बिट मॉलमध्ये पहिल्यांदाच मार्व्हलचा आयर्न मॅनचा मूळ पुतळा ठेवण्यात आला आहे.
आयर्न मॅनची प्रमुख व्यक्तीरेखा असलेला 'द अॅव्हेंजर्स- एज ऑफ अल्ट्रॉन' चित्रपट 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट अमेरिकेआधी एक आठवडा भारतामध्ये प्रदर्शित केला जात आहे. त्यानिमित्तच हा पुतळा इनऑर्बिट मॉलमध्ये ठेवण्यात आला आहे.
हा चित्रपट अॅव्हेंजर्सचा सिक्वल असून यामध्येही आयर्नमॅन (रॉबर्ट डॉवनी ज्यु.), थॉर (क्रिस हेम्सवर्थ), द इनक्रेडिबल हल्क (मार्क रफेलो), कॅप्टन अमेरिका (क्रिस एव्हन्स), ब्लॅक विडो (स्कार्लेट जोहान्सन), हॉकआय (जेरेमी रेनर) हे सुपरहिरो निश्चितच आहेत. टोनी स्टार्क एका निद्रिस्त पिसकिपींग प्रोग्रॅमला पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे परिस्थिती हाता बाहेर जाते व 'अल्ट्रॉन' हा खलनायक उदयास येतो. त्याला थांबविण्याची जबाबदारी आता अॅव्हेंजर्सवर आहे.
जॉस व्हेडन यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नेहमीच लोकप्रिय ठरलेल्या मार्व्हल कॉमिक्सवरूनच घेण्यात आला आहे. 'द अॅव्हेंजर्स' हे कॉमिक बुक 1963 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले होते.