आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू Gay आहेस का.. विमानतळावरच एकाने विचारले.. करणच्या पुस्तकात होणार अनेक खुलासे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाहरुख खान आणि करण जोहर. - Divya Marathi
शाहरुख खान आणि करण जोहर.
मुंबई - करण जोहर कधीही त्याच्या सेक्श्युअल ओरिएंटेशनबाबत बोलत नाही. करण जोहर आणि को-ऑथर पूनम सक्सेना यांच्या 'अॅन अनसूटेबल बॉय' मध्ये करणच्या माहितीवरुन या सर्व बाबींचा मोकळेपणाने उल्लेख करण्यात आला आहे. 

शाहरुखबरोबर नाव जोडल्याबाबत बोलला करण.. 
करण म्हणाला की, अनेक वर्षांपासून शाहरूख आणि माझ्या नात्याबाबत अनेक प्रकारच्या अफवा पसरत आहे. मी या सर्वामुळे बरेच दिवस तणावातही होतो. एका हिंदी चॅनलच्या शोमध्ये ही सहभागी झालो होतो. त्यावेळी मला शाहरूखच्या बाबतीत विचारण्यात आले. मुलाखत घेणाऱ्याने मला म्हटले की, तुमच्या दोघांमधील हे नाते अत्यंत अजब आहे. त्याने हे सर्व अशा प्रकारे म्हटले की, मला त्याचा प्रचंड राग आला. मी त्याला म्हटलो की, मी जर तुला म्हटलो तु तुझ्या बावाबरोबर झोपतोस तर तुला कसे वाटले? तो मला म्हणाला, तुम्ही मला असे कसे बोलू शकता? त्यावर मीही त्याला म्हटलो तुम्ही मला असे प्रश्न कसे विचारू शकता?

'शाहरुख पित्याच्या जागी'
आता मी या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करणार नाही. माझ्यासाठी शाहरूख खान माझ्या पित्याच्या आणि मोठ्या भावाच्या स्थानी आहे. अशा प्रकारच्या अफवा या हास्यास्पद आहेत. मी आता या सर्वाचा ताण घेत नाही. लोक अशा प्रकारे बोलतच राहतात. शाहरूखबाबत बोलताना करण म्हणाला, एखाद्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर नसेल तर लोक त्याला गे समजतात. 

एअर पोर्टवर एकाने विचारला विचित्र प्रश्न.. 
करन सांगतो की, रोज झोपेतून उठल्याबरोबर त्याला ट्वीटरवर 200 हेट कमेंट वाचायला मिळतात. त्यात लिहिलेले असते, तुम्ही आमच्या देशाला, समाजाला खराब करत आहात. मला त्यांचे हसू येते. हद्द तर तेव्हा झाली जेव्हा हिथ्रो विमानतळावर (लंडन) एका अनोळखी व्यक्तीने मला विचारले होते, की तुम्ही गे आहात हे खरे आहे का? मी त्याल उत्तर दिले का, तुम्हाला इंटरेस्ट आहे का? त्यावर तो व्यक्ती चिडला आणि भांडू लागला. 

मला होमोसेक्श्युयालिटीचा पोस्टर बॉय बनवले 
करन म्हणाला, मी जेव्हा एखाद्या एकट्या पुरुषाबरोबर असतो तेव्हा भिती वाटते की, लोकांना वाटेल मी त्याच्या बरोबर काय करायला चाललो आहे. मी कधीही यापूर्वी ओरिएंटेशन किंवा सेक्श्युयालिटीबाबत बोलत नव्हतो. कारण तो माझा मुद्दा आहे.  मी होमोसेक्श्युअल आहे, बायसेक्श्युअल आहे की हेटेरोसेक्श्युअल तो माझा मुद्दा आहे. मी या सर्वाबाबत बोलत नाही. लोक माझ्याबाबत काय चर्चा करतात हे मला माहिती आहे. मी देशात होमोसेक्श्युयालिटीचा पोस्टर बॉय बनलो आहे. पण खरं तर मला लोक काय बोलतात याने काहीही फरक पडत नाही. 
 
पुढी स्लाइड्सवर वाचा, करण जोहर काय म्हणाला शाहरूख बाबत आणि स्वतःबाबत...