आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर प्रथमच एअरपोर्टवर दिसली अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इशिता आणि तिचा पती वत्सल सेठ. - Divya Marathi
इशिता आणि तिचा पती वत्सल सेठ.

मुंबई - अजय देवगणची फिल्म 'दृष्यम'मध्ये त्याच्या मुलीचा रोल करणारी अभिनेत्री इशिता दत्ता हनिमुनला रवाना झाली आहे. लग्नानंतर इशिता प्रथमच शनिवारी हसबंड वत्सल सेठसोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. अशी माहित आहे, की इशिता सिंगापूरमध्ये हनिमून एंजॉय करणार आहे. गेल्या आठवड्यात इशिता आणि वत्सलचे मुंबईत इस्कॉन मंदिरात लग्न झाले. या लग्नाला काही निवडक निमंत्रित होते. तिची बहीण देखील या लग्नाला उपस्थित नव्हती. 

 

वत्सलही अजय देवगणचा ऑनस्क्रिन मुलगा
- इशिताने 'दृष्यम'मध्ये अजयच्या मुलीचा रोल केला होता. तर तिचा पती वत्सल सेठ हा देखील अजय देवगणचा ऑनस्क्रिन मुलगा आहे. 
- 'टार्जन: द वंडर कार'मध्ये वत्सलने अजयच्या मुलाचा रोल केला होता. 
- शुक्रवारी रिलीज झालेल्या फिरंगीमध्ये इशिता लीड रोलमध्ये आहे. या फिल्ममध्ये तिच्या अपोजीट कपिल शर्मा आहे. तर वत्सल सेठ सध्या सोनी टीव्हीचा शो 'हासिल'मध्ये आहे. 

बातम्या आणखी आहेत...